हैद्राबाद दि.१७ (प्रतिनिधी)भारत राष्ट्र समितीच्या वतीने राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचे दोन दिवसीय राज्य स्तरीय प्रशिक्षण शिबीर नांदेड येथील "अनंता लॉन्स" येथे आयोजित करण्यात आले असुन या शिबिरासाठी भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा तेलंगाना राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) हे उपस्थित राहणार असल्याची माहिती भारत राष्ट्र समिती किसान सेलचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष माणिकराव कदम यांनी दिली आहे.
भारत राष्ट्र समिती ने राज्यात जोरदार मुसंडी मारली असुन मराठवाड्यातील झालेल्या सभांमुळे भारत राष्ट्र समितीची चर्चा राज्य भरात सुरु झाली आहे.
राज्यातील गावखेड्यात के.सी.आर यांच्या विविध योजनांची चर्चा जोरदार होत असुन आता सामान्य नागरीकांसोबत प्रशासकीय अधिकारी सुध्दा राज्यात के.सी.आर यांचे तेलंगाना मॉडेल लागु करावे अशी मागणी करत आहेत.
भारत राष्ट्र समातीने राज्यातील सर्वच निवडणुका लढवण्याची तयारी सुरू केली आहे.या तयारीचा भाग म्हणुन नांदेड येथे दि.१९ व २० मे २०२३ रोजी अनंता लॉन्स येथे २८८ विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचे राज्य स्तरीय पहिले प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. शिबिरास भारत राष्ट्र समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा तेलंगाण राज्याचे मुख्यमंत्री श्री के. चंद्रशेखर राव हे उपस्थित राहणार आहेत.
या शिबिरात भारत राष्ट्र समितीची ध्येय धोरणे , प्रत्येक गावात शाखा कोअर कमिटी स्थापना अभियान (मुख्य शाखा, किसान सेल, युवक सेल, महिला सेल, एस सी सेल, एस टी सेल, अल्पसंख्याक सेल, कामगार सेल आदी) , महाराष्ट्रातील समस्या बद्दल चर्चा, शेतकरी आत्महत्या थांबण्यासाठी ठोस उपाय योजना, सह येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तयारी, विधानसभा निवडणुका तयारी ,पक्ष सदस्य नोंदणी महाआभियान व प्रचार या संबंधाने चर्चा होणार आहे.
या शिबिरात फक्त निमंत्रीत सदस्यांनाच प्रवेश मिळणार असुन या शिबीरार्थींची निवास व्यवस्था गुरुव्दारा येथील पंजाब भवन येथे करण्यात आली आहे. शिबीर अनंता लॉन्स श्री गुरुजी चौक पुर्णा रोड नांदेड येथे होणार असल्याचे समितीचे राज्य समन्वयक माणिकराव कदम यांनी दिली आहे
.या शिबीरासाठी मुख्यमंत्री श्री के चंद्रशेखर राव,किसान समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष गुरुनाम चुडणी,राज्य अध्यक्ष माणिकराव कदम,माजी आमदार शंकर आण्णा धोंडगे, हिमांशु तिवारी,माजी, खासदार हरिभाऊ राठोड,मा.खासदार धर्माण्णा शादुल, मा आ अण्णा साहेब माने, अल्पसंख्याक समाजाचे नेते अब्दुल कादिर मौलाना, मा.आ हर्षवर्धन जाधव,मा.आ दिपक आत्राम,मा.आ. चरण वाघमारे,मा.आ.राजु तोडसाम,मा.आ. मनोहर पटवारी,मा. आ.डॉ वसंत बोंडे,मा.आ.गंगाधर भिसे मा.आ.दिगांबर विशे, आदिवासी नेते प्रविण अण्णा जेठेवाड, वैजापूर विधानसभा नेते अभय पाटील चिकटगावकर, गंगापूर विधानसभा नेते संतोष माने पाटील, ओ. बी. सी. समाजाचे नेते बाळासाहेब सानप, बिड जिल्ह्याचे नेते दिलीप गोरे पाटील, ऊसतोड कामगार नेते शिवराज बांगर, धाराशिव जिल्ह्याचे नेते प्रशांत नवगिरे, विभागीय समन्वयक दशरथ सावंत, प्रा विजय मोहिते,नाना बच्छाव ,बी. जे. देशमुख, सोमनाथ थोरात ,अनिकेत देशमुख,ज्ञानेश वाकुडकर, रामरेडी आईटवार, विठल नाईक, गंगाधर पाटील चाभरेकर, दलित नेते सुरेश दादा गायकवाड, प्रा यशपाल भिंगे, जाकेर चाऊस, सुधीर बिंदु , सविता ताई वारकड, नाझणीन ताई सय्यद , फेरोज पटेल, फेरोज कच्छी, बाबुराव कदम, नामदेव चव्हाण, ॲड जिनत पर्धान, रेश्मा चव्हाण ताई,सुनीता ताई बेरूळकर ,कीर्ती पांडे ताई ,सुवर्णा काटे ताई, कामगार नेते गौतम भद्रे,दिलीप दादा धोंडगे, शिवराज धोंडगे, डॉ सुनील धोडगे, विजय धोंडगे, मोहम्मद फारूख , सलिम सेवा, मतीन भाई तमन्ना , गोरख पाटील, प्रल्हाद राखोंडे यांच्या सह राज्यातील प्रमुख पदाधिकारी व नेते उपस्थित राहणार आहेत.