जिंतूर: तालुक्यात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात सतत 3 आठवड्यापेक्षा जास्त दिवस पावसाने खंड दिल्याने तालुक्यातील सोयाबीन, कापूस यासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे 50% पर्यंत उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली.

            6 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिंतूर तालुक्यातील केवळ दुधगाव मंडळाचा अग्रीम पिकविमा पंचनामा यादीमध्ये समावेश करण्यात आला व उर्वरित मंडळे वगळण्यात आली. त्यामुळे वगळण्यात आलेल्या सर्वच मंडळांचा अग्रीम पिकविमा पंचनामा यादीमध्ये समावेश करून तात्काळ नुकसानीच्या 25 टक्के अग्रीम वितरित करण्याचे आदेश विमा कंपनीला देण्यात यावेत अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसीलदार यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली. या निवेदनावर भारतीय जनता पार्टीचे जिंतूर तालुकाध्यक्ष लक्ष्मण बुधवंत यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत