बीड शहरातील बार्शी नाका,ईमामपूर रोड वरील प्रकाश आंबेडकर नगर मधील बौद्ध विहाराची पुनर्बांधणी करावी अशी मागणी बऱ्याच दिवसापासून या भागातील नगरसेवक लक्ष्मन विटकर सह स्थानिक नागरिकांनी मा.आमदार संदिप क्षिरसागर यांच्याकडे केली होती. त्यानंतर आमदार संदीप क्षीरसागर यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये बौद्ध विहार कामाचा शुभारंभ करण्यात आला.

या भागातील लहान मुलांना तसेच नागरिकांना वंदना घेण्यासाठी तसेच सर्वच महापुरुषांच्या जयंती साजरी याच बौद्ध विहारात केल्या जात होत्या परंतु हें बांधकाम बऱ्याच वर्षापूर्वी चे असल्याने खिडक्या,दरवाजे,छतावरील पत्रे खराब झाले होते,भिंतीची दुरवस्था झाली होती त्यामुळे विविध कार्यक्रम घेण्यास अडथळा निर्माण झाला होता.त्यामुळे या बौद्ध विहाराची पुनर्बांधणी होणे आवश्यक होती.हें काम आमदार संदीप भय्याने फंडातून निधी उपलब्ध करून बांधकाम करून द्यावे अशी मागणी होत होती. प्रकाश आंबेडकर नगर येथील बौध्द विहाराच्या कामास आपल्या आमदार फंडातून निधी देऊन बौद्ध विहाराच्या कामास मंजुरी दिली.या विहाराच्या कामासाठी माजी नगरसेवक लक्ष्मण 

विटकर,रि.पा.ई.चे शहर अद्यक्ष चेतन चक्रे,अमोल अहिरे यांनी पाठपुरावा करून कामाची तात्काळ सुरुवात करावी अशी मागणी आमदार यांना केली,आमदार यांनी काल दिनांक 10 में रोजी प्रत्यक्ष कामास सुरुवात केल्याने बार्शी नाका,प्रकाश आंबेडकर नगर मधील नागरिकांनी आभार व्यक्त केले.

 या वेळी आमदार संदिपभैय्या क्षिरसागर,मा.आमदार सय्यद सलीम साहेब यांच्या हस्ते नारळ फोडून कामास सुरुवात करण्यात आली.बार्शी नाका प्रभागातील या भागातील कामे,समस्या सह विविध अडीअडचणी सोडवणार सदैव तत्पर,कटीबद्ध आहे असे आश्वासन आमदार संदीप भय्या क्षीरसागर यांनच्या कडून सांगण्यात आले. अशपाक भाई ईनामदार,लक्ष्मण विटकर (नगरसेवक),चेतन चक्रे,अमोल अहिरे,राजु कांबळे,सचिन बोबडे,कुणाल पायाळ,संतोष भोले,सम्राट वीर,कुणाल मोहिते,सह बार्शी नाका प्रकाश आंबेडकर नगर मधील नागरिक या विहाराच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते.