व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने आपल्या विविध मागण्यासाठी शिरूर कासार तहसील समोर धरने आंदोलन सुरू केले आहे यावेळी शिरूर तालुक्यातील अनेक पत्रकार बांधवांची उपस्थिती होती.

पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करुन त्याला भरीव निधी द्यावा. पत्रकारितेत ५ वर्षे पूर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावी. वृत्तपत्रांना सध्या जाहिरातीवर लागू असलेला जीएसटी रद्द करावा. पत्रकारांच्या घरांसाठी विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घ्यावा, कोरोनात जीव गमावलेल्या पत्रकारांना फ्रंट लाईन वर्करचा दर्जा देऊन त्यानुसार मयत पत्रकारांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे.शासनाचे सध्याचे जाहिरात धोरण क वर्ग दैनिके (लघु दैनिक) यांना मारक आहे. लघु दैनिकांनाही मध्यम (ब वर्ग) दैनिकांइतक्याच जाहिराती देण्यात याव्यात. साप्ताहिकांनाही त्या प्रमाणात जाहिराती द्याव्यात.

यावेळी राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष महेबूबभाई शेख, आमदार सुरेश आण्णा धस यांचे स्विय्य सहाय्यक आप्पासाहेब येवले, शिरुर नगरपंचायतचे नगराध्यक्ष रोहीदास पाटील गाडेकर,उपनराध्यक्ष प्रकाश देसरडा , यांनी भेट देऊन पाठींबा दिला त्याप्रसंगी पञकार संघाचे शिरूर कासार तालूकाध्यक्ष अशोक शिंदे, रामेश्वर क्षीरसागराळे, विष्णुपंत सव्वासे,नुर शेख,बाळकृष्ण मंगरूळकर,अशोक मोरे,राजेंद्र काळे,राज कातखडे, गोरक्ष खेडकर,गौतम औसरमल,दिगांबर गायकवाड,प्रकाश साळवे,बबन रंधवे,गोकुळ सानप,रायमोहाकर उपस्थितीत होते पञकारांच्या विविध मागण्याचे निवेदन शिरूर कासार तहसिल कार्यालयाचे तहसिलदार बाळासाहेब खेडकर यांना देण्यात आले.