तालुक्यातील चुंबळी फाट्यावरील चौकामध्ये प्रवाशांसाठी निवारा नसल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत . यासाठी प्रवाशांकरिता निवाऱ्याची सोय करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.संजय तांदळे यांनी पाटोदा तहसीलदार यांच्याकडे केली आहे.

 हे ठिकाण म्हणजे वर्दळीचे आणि प्रवाशांच्या थाब्यांचे ठिकाण असून  या ठिकाणावरून प्रवासी पाटोदा तालुक्यातील विविध गावात जात येत असतात. तसेच पुणे मुंबई  बीड कडेही जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु या ठिकाणी प्रवाशांना ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण मिळावे यासाठी असा कोणताही निवारा नसल्याने प्रवाशांची गैरसोय निर्माण झाली आहे . विशेष करून महिलांना लहान बालकांना तसेच वयोवृत्तांना अधिकचा त्रास सहन करावा लागत आहे .उन्हाळ्यामध्ये काही वेळा  उन्हामध्ये ऊन लागून काही    प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ देखील आलेली आहे. गेली चार वर्षापासून बीड जिल्हा सामाजिक कार्यकर्ता व पाटोदा तालुका सामाजिक कार्यकर्ता संघटनेच्या  वतीने चुंबळी फाटा चौकामध्ये प्रवाशांसाठी निवाऱ्याची सोय करण्याबाबत गेली चार वर्षापासून लोकशाही मार्गाने आंदोलन करून तहसीलदार यांना निवेदन दिलेले आहेत. गेल्या वर्षी देखील सहा मे 2022 रोजी पाटोदा तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले होते .

परंतु प्रशासनाने याची अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही  व निवाऱ्याची सोय देखील संबंधित प्रशासनाने केलेली नाही . प्रवाशांसाठी निवारीची सोय तात्काळ करण्यात यावी अशी मागणी पाटोदा तहसीलदार रूपाली चौगुले यांना  निवेदनाद्वारे दिनांक 9 मे 2023 रोजी बीड जिल्हा सामाजिक कार्यकर्ता संघटनेच्या वतीने डॉ संजय तांदळे यांनी केली आहे. निवेदनात म्हटले आहे  की, बीड जिल्हा सामाजिक कार्यकर्ता व पाटोदा तालुका सामाजिक कार्यकर्ता संघटनेच्या वतीने गेली चार वर्षापासून चुंबळी फाटा वरील चौकामध्ये प्रवाशांसाठी निवाऱ्याची सोय व्हावी यासाठी शासन दरबारी पाठपुरावा चालू असून अद्याप पर्यंत प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही व या ठिकाणी निवाऱ्याची सोय करण्यात आलेले नाही .या  ठिकाणी प्रवाशांना निवाराची सोय नसल्याने ऊन वारा पाऊस यापासून प्रवाशांना सातत्याने त्रास होत आहे. उन्हाळ्यात काही प्रवाशांना ऊन लागल्यामुळे रुग्णालयात ऍडमिट करण्याची  वेळ देखील आलेली  आहे.  या चौकात अनेक अपघात देखील झालेले आहेत .प्रवासी उभे राहतात असलेल्या ठिकाणी एका फळे विक्रेत्याच्या गाड्याला देखील एका खाजगी वाहनाने  धडक दिलेली आहे . या ठिकाणी भविष्यात  दुर्दैवी घटना घडल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील. येत्या सहा महिन्यात प्रवाशांसाठी निवाऱ्याची सोय न केल्यास जनसामान्यातून वर्गणी गोळा करून निवाऱ्याची सोय करण्यात येईल अशा असा इशारा देखील निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रती उपविभागीय अधिकारी पाटोदा, जिल्हा अधिकारी बीड, पोलीस अधीक्षक बीड व परिवहन राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना देखील देण्यात आल्या आहेत.  यावेळी निवेदन देताना डॉ संजय तांदळे, सुदाम कोळेकर ,पाटोदा येथील सामाजिक कार्यकर्ते शेख जावेद, संतोष गर्जे  ,मोहन नागरगोजे, पांडुरंग गरजे , स्वामी सानप आदि उपस्थित होते.