एम. टी. डी. सी. च्या कलाग्राम औरंगाबाद येथे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उपक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद

औरंगाबाद;स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फंत विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यास अनुसरुन महामंडळाच्या कलाग्राम येथील प्रकल्पामध्ये असलेल्या उपलब्ध सोयी-सुविधा यांचा वापर करत महामंडळाकडुन युवकांसाठी अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आला. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि आसावा ब्रदर्स कॉमर्स, ज्युनियर आणि सिनियर महाविद्यालय, सिडको,औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम महामंडळाच्या कलाग्राम, औरंगाबाद येथे (दि 07)रोजी “Start -Up Akhada”या नावाने आसावा ब्रदर्स कॉमर्स, ज्युनियर आणि सिनियर महाविद्यालय, सिडको, औरंगाबाद यांच्या विद्यार्थ्यांमार्फंत साजरा करण्यात आला आहे.  

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या कलाग्राम औरंगाबाद येथे साधारणपणे 98 शॉप्स असुन विविध उपक्रमांसाठी, कार्यक्रमांसाठी तसेच डेस्टीनेशन वेडींग्स, स्वागतसमारंभ यांसाठी लॉन आणि सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. सदरच्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी, महोत्सवांसाठी सुविधा असुन आर्ट आणि क्राफ्ट, हस्तकला यांच्या प्रदर्शनासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत महामंडळामार्फत विविध उपक्रम राबवुन पर्यटनाला चालना देण्याच्या सुचना व्यवस्थापकिय संचालक जयश्री भोज यांनी दिल्या आहेत.

 सदर उपक्रमांच्या अनुषंगाने युवकांमध्ये देशभक्तीचा भावना वाढीस लागावी आणि हे ऐतिहासिक, गौरवपुर्ण वर्ष उत्साहाने साजरे करता यावे, ही यापाठीमागची भावना आहे. या वर्षामध्ये संपुर्ण देशातील वातावरण देशभक्तीमय व्हावे, त्यानिमित्ताने उत्साह आणि प्रेरणा मिळुन युवा शक्तीला योग्य दिशा मिळावी या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत.महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे मा. महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा उपक्रम कलाग्राम औरंगाबाद येथे साजरा करण्यात येणार आहे.“Start -Up Akhada” या कार्यक्रमाच्या निमित्ताने युवकांमध्ये संवाद कौशल्य, टिम वर्क, व्यवहार कौशल्य, मॅनेजमेंट इत्यादी बाबींचा वापर दैनंदिन जीवनामध्ये विद्यार्थ्यांनी / युवकांनी कसा वापर करावा, याबाबत विद्यार्थ्यांमार्फंत सादरीकरण आले. तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी खादय पदार्थ स्टॉल, गेम स्टॉल, शैक्षणिक स्टॉल, शॉपिंग स्टॉल इत्यादी स्टॉल लावण्यात आले. सदरचा उपक्रम विद्यार्थ्याकडुन विद्यार्थी, पर्यटक आणि औरंगाबाद वासियांसाठी आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रम सर्वांकरिता खुला ठेवण्यात आला होता. सदरच्या उपक्रमास साधारणपणे 4000 ते 5000 पर्यटक आणि स्थानिकांनी, तसेच विविध शैक्षणि संस्थांच्या विद्यार्थी व युवावर्गाने हजेरी लावुन उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आसावा ब्रदर्स कॉमर्स, ज्युनियर आणि सिनियर महाविद्यालय, सिडको, औरंगाबाद चे विद्यार्थी, प्राध्यापक आणि कलाग्राम चे व्यवस्थापक तिंगोटे यांनी विशेष परिश्रम घेतले आहे. औरंगाबाद वासियांनी आणि राज्याच्या पर्यटन राजधानीत येणाऱ्या पर्यटकांनी सदरच्या कार्यक्रमात भाग घेवुन स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे हे ऐतिहासिक, गौरवपुर्ण वर्ष साजरे करण्याचा आनंद द्विगुणित झाला असे समाधान उपस्थितांमधुन व्यक्त करण्यात येत होते, असे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दिपक हरणे यांनी सांगितले.