बकोरी ता.हवेली येथील माहिती सेवा समितीचे अध्यक्ष वृक्षमित्र चंद्रकांत वारघडे यांची मुलगी धनश्री व राहुल यांचा विवाहसोहळा नुकताच संपन्न झाला,या विवाह समारंभात वारघडे कुटुंबीयांनी सत्कार समारंभाच्या खर्चाला फाटा देत लग्न समारंभास येणाऱ्या सर्वांना रुद्राक्षाचे झाड देण्याचा संकल्प केले.
वारघडे हे अनेक वर्षांपासून वृक्ष लागवड करत वृक्ष चळवळीचे काम करत आहेत, त्यांनी बकोरी तसेच पिंपळे जगताप येथे सहकाऱ्यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली आहे, तर वारघडे कुटुंबीय स्वतः दररोज बकोरी येथील डोंगरावर लावलेल्या झाडांचे संगोपन करत आहेत.
सतत होत असलेली वृक्षतोड, पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास हे थांबवण्यासाठी त्यांनी केलेली वृक्ष लागवडीची चळवळ अधिक व्यापक करण्याच्या संकल्पनेतून वृक्षप्रेमी वारघडे कुटुंबीयांनी लग्न समारंभाला येणाऱ्या सर्वच नागरिकांना सर्वांनाच रुद्राक्षाचे झाड दे वृक्ष लागवड करण्याचा संदेश दिला यावेळी तब्बल 1100 झाडे वाटप करण्यात आले
या विवाहप्रसंगी आमदार अशोक पवार आमदार निलेश लंके, माऊली कटके , डॉ,चंद्रकांत कोलते, रामदास दाभाडे, रामकृष्ण सातव,नानासाहेब अबनावे , प्रशांत काळभोर, शांताराम कटके,राजेंद्र सातव पाटील,शिवदास उबाळे, वसुंधरा उबाळे, अर्जना कटके, मोनिका हरगुडे, कुसुम मांढरे,उत्तमराव भोंडवे,दत्तात्रय हरगडे,माऊली अण्णा वाळके ,केशरताई पवार ,सदाशिव पवार, डॉ वर्षा शिवले,आप्पासाहेब काळभोर ,सुनील जाधव,प्रसाद जोशी,अनिल काशीद, प्रफुल्ल शिवले,शरद पाबळे, सचिन धुमाळ, सुरेश वांढेकर,विजय लोखंडे, सुनील भंडारे ,शंकर पाबळे ,बाळासाहेब वारघडे ,राजेश वारघडे ,सर्जेराव कुटे, विजय गाडुते,ईश्वर गाडुते ,सोपान वारघडे ,संपत बहिरट,मस्कु बहिरट , किसन शितकल ,सागर वारघडे,दत्तात्रय वारघडे, सुभाष वारघडे,गुलाबराव वारघडे,, वाल्मिक वारघडे ,विलास जाधव ,प्रकाश कुटे , सत्यवान गायकवाड, संतोष वारघडे ,अंकुश कोतवाल, धर्मराज बोत्रे,कमलेश बहीरट, किरण खराबे , मोहीनी तांबे, राजेंद्र खांदवे,सागर खांदवे , संतोष कांचन,उषाताई कळमकर ,नारायण गलांडे ,सोमनाथ मोहीते,कुलदिप चरवड,मिलींद हरगुडे ,प्रभाकर शेळके,लक्ष्मण गव्हाणे, शरद टेमगिरे, बाळासाहेब कोलते, साहेबराव कोलते ,राजेस वारघडे गणेश जाधव ,प्रकाश नागरवाड, दादा कोलते यांच्या सह बकोरी गावातील व परिसरातील आजी माजी सरपंच, सोसायटी चेअरमन ग्रामस्थ तसेच राजकीय सामाजिक क्षेत्रासह सर्वच विभागांतील शासकीय कर्मचारी अधिकारी उपस्थित होते,
यावेळी आमदार अशोक पवार आणि आमदार निलेश लंके यांनी वारघडे व पोटवडे या कुटुंबीयांनी केलेल्या वृक्ष चळवळीचे कौतुक करत सर्वांना वृक्ष लागवडीसाठी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे सांगितले