शिरुर दिनांक ( वार्ताहर ) यशवंत कॉलनी येथील जुन्या पिढीतील सौ . कंचनबाई गोकुळचंद बेदमुथा  वय ८१ यांचे निधन झाले . त्याच्या पश्चात पती ,चार मुले , सुना नातवंडे असा परीवार आहे . प्रसिद्ध उद्योगपती गोकुळचंद बेदमुथा  यांच्या त्या पत्नी होत . तर व्यवसायिक धन्यकुमार बेदमुथा  संतोष बेदमुथा  , आसराज बेदमुथा  ,विनोद बेदमुथा यांच्या त्या आई होत . परिसरातील धार्मिक सामाजिक कार्यात त्याच्या सक्रिय सहभाग होता .शिरुर नजीक गोकुळ वृध्दाश्रम त्याच्या संकल्पनेतुन गोकुळचंद बेदमुथा यांनी उभारला आहे . पारस बेदमुथा , चेतन बेदमुथा  ,आकाश बेदमुथा  ,आतिश बेदमुथा  , यश बेदमुथा  ,कलश बेदमुथा यांच्या त्या आजी होत .तर  जय ,ओम , रूद्रांश ,मयंक हे त्याचे पतु  आहेत . कंचनबाई बेदमुथा  यांच्यावर शनिवार दिनांक ६ मे रोजी सकाळी साडेदहा वाजता  शिरुर येथील अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत .