सद्यस्थितीत बीड जिल्हयामध्ये ऊसतोड मजुरांच्या पाल्यांचे प्रचंड हाल होत असुन त्यांचे पालक जिल्हयाच्या बाहेर ऊसतोडण्यासाठी जात असल्याने या परिस्थितीची पाल्यांच्या हालअपेष्ठांमध्ये अधिकच भर पडली आहे. याकरीता जिल्हा परिषदे मार्फत अशा पाल्यांच्या शैक्षणिक गरजा भागवण्याकरीता व त्यांच्या उपासमारी दुर करण्याकरीता विविध शासकीय सोयी सवलतीची घोषणा केली असु या सोयी सवलतीचा लाभ घेण्यासाठी बीड जिल्हा परिषदे मार्फत संकेतस्थळावरील ऊसतोड मजकुर कामगार या लिंकवर अशा ऊसतोड कामगाराच्या पाल्यांनी व पालकांनी ऊसतोड लोकनेते स्व गोपीनाथराव मुंडे महामंडळा अंतर्गत कार्यान्वीत केलेल्या योजनेचा लाभ घेणायाकरीता नोंद करावी असे मा. जिल्हाधिकारी महोदया, बीड यांनी विविध सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना विश्वासत घेऊन जनतेस आव्हान केले आहे. सदरचे आव्हान करताना त्यांना असे सांगितले की, या क्षेत्रात कार्यरत राहणाऱ्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी या योजनेचा लाभ ऊसतोड कामगार पाल्यांना मिळवून देण्याकरीता व संकेत स्थळावरील नोंद करण्याकरीता आपले योगदान द्यावे या प्रयोजनास अनुसरुन जिल्हयातील सर्व ऊसतोड कामगार पाल्यांना त्यांच्याकरीता असलेल्या शासकीय योजनेचा विनाविलंब लाभ प्राप्त व्हावा याकरीता बार्शी नाका, बीड येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक ढोल हे अविरत प्रयत्न करीत आहेत. याचाच भाग म्हणुन ऊसतोड कामगार पाल्यांनी व पालकांनी बीड जिल्हा परिषदेच्या संकेत स्थळावर शासकीयरृ योजनेचा लाभ मिळण्याकरीता विनाविलंब नोंद करावी व शासकीय योजनेचा लाभ प्राप्त करुन घ्यावा अशी माहिती प्रसिध्दीपत्रकान्वये सामाजिक कार्यकर्ते तथा युवा नेते अशोक(दादा) ढोले पाटील यांनी जनहितार्थ दिली आहे.