वीज वापर करायचा अन वीज बिलाचे पैसे भरण्याकडे पाठ फिरवायची. यामुळे विजेचे पैसे वसूल होत नसल्याने महावितरणची आर्थिक स्थिती गंभीर झाली आहे. विकलेल्या विजेचे पैसे वसूल होत नसल्याने थकबाकीसाठी अनेक वेळा सूचना देवूनही दखल न घेणा—या अशा मराठवाडयातील कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित 44,619 ग्राहकांना न्यायालयीन नोटिसा अर्थात रिकव्हरी सुट पाठविण्यात आल्या होत्या. अशा ग्राहकांकडून मराठवाडयात 504.43 लाख रूपये वसूल करण्यात आले आहेत.
महावितरणला वीज विकत घेवून ग्राहकांना वीज पुरवठा करावा लागतो.विकलेल्या विजेचे पैसे दरमहा वसूल होत नसल्याने अनेक वेळा नोटिसा, सूचना, एसएमएस करून थकबाकीदार ग्राहकांकडे पाठपुरावा केला जातो. मात्र थकबाकी न भरणा—या ग्राहकांचा विघुत कायदयानुसार कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित करून संबंधितांचे मीटर वायर काढून आणले जाते. त्यानंतर सदर ग्राहक वीज बिलाच्या थकबाकीचा भरणा न करता कानाडोळा करत असल्याने महावितरणच्या वीज बिलाचा महसूल थकीत राहून डोंगर वाढतच राहतो. सदर ग्राहकांकडे थकीत वीज बिलासाठी पाठपुरावा करूनही दखल न घेणा—या ग्राहकांना महावितरणने वसूलीसाठी रिकव्हरी सुट अर्थात न्यायालयीन नोटिसा संबंधितांना बजावण्यात आल्या होत्या. यामध्ये घरगुती ग्राहक, औघोगिक व इतर ग्राहकांचा समावेश आहे.
ग्राहकांना न्यायालयात दाखल नोटिसा व वसूल रक्कम खालिल प्रमाणे
मंडल कार्यालय दाखल नोटिसा वसूल रक्कम लाख रूपये
1 छत्रपती संभाजीनगर 6,343 35.42
शहर मंडल
2 छत्रपती संभाजीनगर 8,319 76.82
ग्रामीण मंडल
3 जालना मंडल 1,050 .....
छत्रपती संभाजीनगर
परिमंडल एकूण 15,712 112.24
4 लातूर मंडल 20 59.05
5 बीड मंडल 4,047 .....
6 धाराशिव मंडल 15 ......
लातूर परिमंडल एकूण 4,082 59.05
7 नांदेड मंडल 8,008 80.13
8 परभणी मंडल 10,140 150.44
9 हिंगोली मंडल 6,677 102.57
नांदेड परिमंडल एकूण 24,825 333.14
मराठवाडा एकूण 44,619 504.43
मराठवाडयातील कायमस्वरूपी खंडित थकबाकीदारांना नोटिसा बजावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित ग्राहकांनी सदर बिलाचा भरणा न केल्यास त्यांना न्यायालयीन कामकाजासाठी वकिलाच्या फिसचा खर्च, मानसिक़ त्रास, न्यायालयीन वेळ याचा त्रास सहन करावा लागणार आहे. न्यायालयीन नोटिसा अर्थात रिकव्हरी सुट पाठविण्यात आलेल्या 37 उर्वरित ग्राहकांनी विलंब न लावता थकबाकीचा भरणा करावा. व वीज ग्राहकांनी चालू वीज बिलासह थकबाकीचा भरणा करून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन महावितरण छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांनी केले आहे.