मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळामार्फत अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाकरीता २०२२-२३ या शैक्षणिक वर्षामधील कर्ज योजनेचे अर्ज स्वीकारण्याची कार्यवाही सुरू असून इच्छुकांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
मुस्लिम, ख्रिश्चन, बोद्ध, जैन, पारसी, शिख, ज्यू या अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय, अभियांत्रिकी, एमबीए, औषधशास्त्र आदी अभ्यासक्रमांच्या उच्च शिक्षणाकरीता साठी कर्ज देण्यात येणार आहे.
अधिक माहितीकरीता https://www.malms.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी अथवा मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ मर्या, ६४७, गोल्डन ज्युबिली इमारत, पुना विद्यालयासमोर, हरका नगर, भवानी पेठ- ४११०४२ या पत्त्यावर संपर्क साधावा. योजनेचा लाभ अल्पसंख्याक समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे प्रभारी जिल्हा व्यवस्थापक रिजवान पठाण यांनी केले आहे.