प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत अद्याप जिल्ह्यातील 2 लाख 60 हजार 360 शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण प्रलंबित आहे. पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी करण्यासाठी 31 जुलै 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून या मुदतीत प्रमाणीकरण करुन घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
पात्र लाभार्थ्याना ई-केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमेट्रीक हे पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत. योजनेच्या लाभासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांनी वेळेत ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. जिल्ह्यात आजअखेर एकूण 4 लाख 98 हजार 80 शेतकऱ्यांपैकी 2 लाख 37 हजार 720 शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण केलेले आहे. उर्वरीत 2 लाख 60 हजार 360 लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण प्रलंबित आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी दिली आहे.