शिरुर दिनांक ( वार्ताहर ) शिरुर परिसरात मोठ्या उत्सहात ६३ व्या महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला .          महाराष्ट्र दिनाचा मुख्य शासकिय ध्वजारोहनाच्या कार्यक्रम शिरुर तहसिल कार्यालयाच्या आवारात झाला .आमदार ॲड .अशोक पवार यांच्या हस्ते झेंडावंदन झाले. यावेळी तहसिलदार बाळासाहेब म्हस्के ,गटविकासाधिकारी अजित देसाई ,  दिलिप ठाकरे यांच्यासह नायब तहसिलदार स्नेहा गिरगोसावी , महसूल नायब तहसिलदार प्रकाश मुसळे ,संजय गांधी निराधार योजना नायब तहसिलदार सुवर्णा खरमाटे ,निवडणुक नायब तहसिलदार सुजाता गायकवाड , अनिल पाटील , यशवंत वाटमारे , त्याच बरोबर नोटरी शिरीष लोळगे , नोटरी रवींद्र खांडरे , संदिप कडेकर , रंजन झांबरे यांच्या सह काही माजी सैनिक उपस्थित होते . शिरुर नगरपरिषद येथे मुख्याधिकारी ॲड प्रसाद बोरकर यांच्या हस्ते झेंडावंदन झाले यावेळी पालिकेतील आधिकारी अय्युब सय्यद , प्रमोद पवार आदी उपस्थित होते . पंचायत समिती येथे गटविकासअधिकारी अजित देसाई यांच्या हस्ते झेंडा वंदन झाले . बाजार समिती शिरुर येथे सहाय्यक निबंधक शंकर कुंभार यांच्या हस्ते झेंडावंदन झाले . विद्याधाम प्रशालेत शिरीष बरमेचा यांच्या हस्ते झेंडावंदन झाले. यावेळी संस्थेचे संचालक चंदुलाल चोरडिया , मुख्याध्यापक पी. डी . कल्याणकर ज्योती मुळे व अश्विनी घारु उपस्थित होते . चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयात प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते यांच्या हस्ते झेंडावंदन झाले . ज्ञानगंगा इंटरनॅशनल स्कुल येथे उद्योजक भानूदास शेळके यांच्या हस्ते झेंडावंदन झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ .प्रा . राजेराम घावटे ,भाजपा जिल्हा संघटक ॲड . धर्मेंद्र खांडरे , गणेश फणसे ,दत्तात्रेय धोंगडे , प्रफुल्ल कुलकर्णी , प्रा व्ही .डी शिंदे , प्रा .डॉ .नितीन घावटे आदी  उपस्थित होते . डेक्कन एज्युकेशन सोसायटी येथे   गायक वैभव मराठे  यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले . यावेळी प्राचार्य डॉ समीर ओंकार आदी उपस्थित होते .