पत्नीला जाळुन जिवे मारल्या प्रकरणी सवना येथील पतीस जन्मठेपेची शिक्षा.

सेनगाव तालुक्यातील सवना येथील पती कुंडलीक शिवराम नायक याने दि. 25 फेब्रुवारी 2022 रोजी पत्नी सुंदराबाई नायकला स्वयंपाक उशीरा का केला याचा राग मनात धरून पत्नी सुंदराबाईचे हातपाय बांधून अंगावर राॅकेल टाकुन तीला मध्यरात्री पेटवून जाळले होते तसेच पुरावा नष्ट केला होता.पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.याप्रकरणी गोरेगाव पोलीसांत गु.र.न. 32/2022कलम 302 ,201 भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आली होती.सदरील तपास गोरेगाव पोलीस ठाण्याच्या तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक श्रीदेवी पाटील यांच्या कडे सोपविण्यात आला होता.याप्रकरणी सहा सरकारी वकील श्री.यस डी कुटे यांनी एकुण 11 साक्षीदार तपासुन युक्तिवाद केला होता यामध्ये फिर्यादी,मृत्युपुर्वी जवाब नोंदविनारे वैद्यकीय अधिकारी व तपास अंमलदार यांची साक्ष महत्त्वाची ठरली असुन अप्पर सत्र न्यायाधीश डी.जी.कांबळे,व जिल्हासत्रन्यायाधीश हिंगोली यांनी आज दि.29, एप्रिल शनिवारी रोजी खटला क्र.65/2022 महाराष्ट्र शासन विरुद्ध आरोपी कुंडलीक नायक रा. सवना यास कलम 302,भादवी अन्वये जन्मठेपेची शिक्षा,3000 रु दंडाची शिक्षा दंड न भरल्यास तिन महिने कठोर कारावास आणि भादवी 201 मध्ये तिन वर्षे कारावास व दोन हजार रुपये दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावासाची शिक्षा सुनावली दोन्ही शिक्षा सोबतच भोगाव्यात असा आदेश झाला आहे .याप्रकरणी तपास अधिकारी गोरेगाव पोलीस ठाण्याच्या तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक श्रीदेवी पाटील यांची साक्ष महत्त्वाची ठरली होती तर या तपासात पोलीस हवालदार राहुल गोटरे, काशिनाथ शिदे, यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.