शिरुर दिनांक ( वार्ताहर ) शिरुर नगरपरिषदेच्या २७ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतुन पालिकेचे आधिकारी दिलिप विष्णु वाघमारे सेवानिवृत्त झाले . वाघमारे यांनी पालिकेतील प्रशासन ,जकात , पाणीपुरवठा सह विविध विभागात काम केले . सध्या ते कर वसुली विभागात कार्यरत होते . प्रशासनातील अभ्यासु व कार्यतत्पर आधिकारी म्हण्य्न त्यांची ओळख होती. सेवानिवृत्त निमित्त त्याच्या सपत्नीक सत्कार मुख्याधिकारी ॲड. प्रसाद बोरकर यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी अय्युबभाई सय्यद , गजानन गायकवाड , संदिप चव्हाण , प्रमोद पवार  अनिल चव्हाण ,दत्तात्रेय क्षीरसागर आदी उपस्थित होते .

फोटो ओळी

शिरुर नगरपरिषदेतील करवसुली विभागातील दिलिप वाघमारे यांच्या सत्कार करण्यात आला .