हर्षी येथे इफ्तार पार्टी..

"इफ्तार पार्टीतून एकात्मता सामाजिक सलोख्याचे दर्शन"

पाचोड विजय चिडे/ पवित्र रमजान महिन्यामध्ये सर्वांनाच सुख-समृद्धी प्राप्त व्हावी तसेच समाजात शांतता प्रस्थापित करण्याकरिता तसेच देशातील सर्व धर्मीयांमध्ये सौहार्द प्राप्त होण्याकरता आपण सर्वांनीच एकत्र येऊन या पुढील काळात निश्चित प्रयत्न करायला हवेत रोजा ठेवणाऱ्या सर्व बांधवांना आत्मिक बळ प्राप्त व्हावे तसेच इफ्तार पार्टीतून एकात्मता सामाजिक सलोख्याचे दर्शन होते. पवित्र रमजान महिन्याच्या अनुषंगाने हर्षी ता.पैठण येथे संत एकनाथ साखर कारखान्याचे चेअरमन सचिन घायाळ यांच्या कडून इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. 

आयोजित इफ्तार पार्टीत सर्वधर्मीय नागरिक उपस्थित होत येथे एकात्मता व सामाजिक सलोख्याचे दर्शन पहायला मिळाले. विचारांची देवाण घेवाण सह सामाजिक एकतेचा संदेश इफ्तार पार्टीतून मिळतो. या कार्यक्रमाला सचिन घायाळ सह पत्नी हाजर होते. यावेळी गावातील सर्व हिंदू मुस्लिम बांधव हजर होते. माजी सरपंच भरत घायाळ, उपसरपंच रईस चाऊस, युनूस चाऊस, गणेश घायाळ, सोपान घायाळ, दिलीप घायाळ, फहाद चाऊस, हसन चाऊस इत्यादी हजर होते.