किशोरवयीन मुलींनी पोलिस ठाण्यांतील कामकाज अनुभवला... 

पाचोड(विजय चिडे) 

पाचोड ता.पैठण येथील आशिश ग्राम रचना ट्रस्ट या संस्थेअंतर्गत नांदर प्राथमिक आरोग्य केंद्रामधील किशोरवयीन मुलींसाठी जीवन कौशल्य अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून पाचोड पोलिस ठाण्याला भेट देऊन तेथील प्रत्यक्ष चालणाऱ्या कामकाजाचा अनुभव त्यांना जवळून घेता आला.त्यामुळे त्यांच्या मनातील पोलिसांबद्दलची असलेली भीती कमी होण्यास मदत मिळाली.

पाचोड परिसरातील हर्षी, थेरगाव, दादेगाव,

सोनवाडी या गावांमधून शंभर मुलींची यावेळी उपस्थिती होती, पोलिस ठाण्याचे  पोलिस उपनिरीक्षक सुरेश माळी यांनी तक्रार कशी करावी, स्टेशनमधील शस्त्रे, लॉकअप, सायबर क्राइम, यासोबतच एक जागरुक नागरिक म्हणून कोणती काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात केले तसेच. संशयित वस्तूला हात लावू नये, गुन्हा घडल्यावर एका जागरुक नागरिकाप्रमाणे पोलिसांचे कान आणि डोळे बनून अशा घडनांबाबत पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहनही विद्यार्थ्यांना करण्यात आले. पोलिस ठाण्यामध्ये कार्यरत असणाऱ्या प्रत्येक विभागात चालणारे कामकाज, पासपोर्ट देताना त्याबाबत पोलिस ठाण्यामध्ये त्याची नोंद का करावी लागते, विविध हत्यारांची नावे, त्यांचा वापर आदी बाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.  यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष माने, उपनिरीक्षक सुरेश माळी, पोलिस नाईक वर्षा कबाडे, सह आशिष ग्राम रचना ट्रस्टच्या कार्यकर्त्या सुनंदा खरात ,भिमा हिवराळे आदींची उपस्थित होती.