वाशिम दिनांक 18 एप्रिल 2023 अरुणाचल प्रदेशातील कॅमिंग व्हॅली येथे चीन सीमेवर देशाचे रक्षण करीत असताना दिनांक 17 एप्रिल 2023 रोजी दुपारी साडेचार वाजता वाशिम जिल्ह्यातील सोनखास येथील भारतीय सैन्य दलातील जवान अमोल गोरे यांना वीरमरण आले.

अमोल गोरे व त्यांचे दोन सहकारी चीन सीमेवर गस्तीवर असताना कॅमेग व्हॅली येथे मुसळधार पाऊस आणि वेगाने वारे वाहत होते बर्फाच्या प्रवाहात  त्यांचे सहकारी वाहून जात असताना अमोल गोरे यांनी त्यांच्या जीवाची परवा न करता त्यांना पाण्याच्या व बर्फाच्या प्रवाहातून वाचवताना अमोल गोरे यांच्या डोक्याला प्रवाहात वाहून आलेला मोठा दगड त्यांच्या डोक्याला लागला  अशातच त्यांना वीरमरण आले दोन सहकारी यांना वाचवण्यात अमोल गोरे यांना यश आले मात्र देशाच्या सुरक्षेसाठी तैनात असताना ते शहीद झाले