माधुरी चिडे हिची गावांतून भव्य मिरवणूक काढून सत्कार
पाचोड(विजय चिडे)नुकत्याच जाहीर झालेल्या पोलिस भरती निकालात मुरमा (ता. पैठण) येथील अशिक्षित अल्पभूधारक शेतकरी कैलास चिडे यांच्या मुलीने यश मिळाले आहे. विशेष म्हणजे मुरमा गावातूनती पहिली महिला पोलिस कॉन्स्टेबल ठरली असून नवी मुंबई पोलिस दलात तिची निवड झाली त्यामुळे माधुरी कैलास चिडे हीची गावकऱ्यांनी रविवारी सायंकाळी भव्य मिरवणूक काढून सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी वडील कैलास चिडे,आई पुष्पाबाई चिडे, भाऊसाहेब चिडे,दिनकर मापारी, गणेश नेमाने,अक्षय लेंभे, ज्ञानेश्वर थावर, एकनाथ चव्हाण, कृष्णा मापारी, रामनाथ लेंभे, आप्पासाहेब शिंदे,रावसाहेब मानमोडे,शाईनाथ मापारी,रामानाथ फटांगडे,गोपिंचद आहेर, शाईनाथ चिडे,एकनाथ मगरे,आबासाहेब थावर,शुभम चिडे,रा,कृष्णा चिडे,पत्रकार विजय चिडे सह आदी नागरिक उपस्थित होते..