अमरावती   :- राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांचा सोमवार दिनांक 17 एप्रिल 2023 रोजी चा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे

          सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी बडनेरा रेल्वे स्टेशन येथे आगमन व शासकीय वाहनाने अमरावती कडे प्रयाण सकाळी 7 वाजून 15 वाजता अमरावती येथे आगमन व राखीव. सकाळी 9:30 वाजता अमरावती येथून शासकीय वाहनाने मोर्शीकडे प्रयाण. सकाळी 10:30 वाजता मोर्शी येथे आगमन व आदिवासीमुलांचे शासकीय वसतिगृह भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती.सकाळी 11:10 वाजता मोर्शी येथून अमरावती कडे प्रयाण. सकाळी 12 वाजता बडनेरा येथे आगमन व शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा मुलींचे वसतिगृह भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. 

      दुपारी 12:30 वाजता बडनेरा येथून शासकीय वाहनाने श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन मोर्शी रोड, अमरावती येथे आगमन व आदिवासीपारधी समाज जनजागृती मेळाव्यास उपस्थिती. तर त्यानंतर दुपारी 2 वाजता श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथून शासकीय वाहनाने नवसारी येथील आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती.तर 2:30 वाजता नवसारी येथून शासकीय वाहनाने परतवाडा कडे प्रयाण असून दुपारी 3:15 वाजता येथे आगमन व राखीव. तसेच दुपारी 4 वाजता शासकीय विश्रामगृह परतवाडा येथून शासकीय वाहनाने आदिवासी मुलामुलींचे शासकीय वसतिगृह, परतवाडा कडे प्रयाण. दुपारी 4 वाजून15 मिनिटांनी शासकीय वसतिगृह, परतवाडा येथे शासकीय वसतिगृह इमारती च्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. तर सायंकाळी 5:15 वाजता शासकीय वसतिगृह परतवाडा येथून शासकीय वाहनाने अमरावतीकडे प्रयाण असून सायंकाळी 6:15 वाजता अमरावती येथे आगमन व राखीव. तसेच सायंकाळी 7 वाजता शासकीय विश्रामगृह, अमरावती येथुन बडनेरा कडे प्रयाण. रात्री 7:55 वाजता बडनेरा येथून मुंबई कडे प्रयाण होणार आहे.