आंबेजोगाई येथील अहिल्याबाई होळकर चौकाची तोडफोड करणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करा: अशोक शेंडगे
वडवणी प्रतिनिधी:हाराष्ट्रातील बहुजन समाज व धनगर समाजाच्या भावना दुखण्याचे काम काही नासक्यात प्रवृत्तीचे लोक करत आहेत.
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे दिनांक ३ ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळी तमाम बहुजनांचे दैवत असणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चौकावरील डिजिटल नामकरण असलेल्या चौकाचे मोठ्या प्रमाणात तोडफोड करून नुकसान केले आहे. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर तात्काळ गुन्हे दाखल करून व अटक करून या समाजकंटकावर लडक शासन करणे गरजेचे आहे जेणेकरून आसल्या सडक्या डोक्याचे लोक पुन्हा असे कृते करणार नाहीत. अशी मागणी धारुर तालुक्यातील तमाम बहुजन बांधवांनी व धनगर समाज बांधवांनी तहसील व पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन केली आहे.
महाराष्ट्रातील तमाम बहुजन समाजाच्या व धनगर समाजाच्या भावना दुखवण्याचे काम जाणून बुजून काही सडक्या मेंदूच्या लोकांकडून केले आहे. त्यामुळे या घटनेचा निषेध बीड जिल्ह्याचा महाराष्ट्रभरातून केला जात आहे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम या घटनेवरून काही लोक करत आहेत. अशा लोकांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे.जेणेकरून बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील कोणत्याही महापुरुषांच्या बाबतीत अशा घटना घडू नयेत. या करता या समाजकंटकांना कडक शासन होणे गरजेचे आहे.