आत्महत्याची पोस्ट फेसबुकवर टाकून ५० वर्षी व्यक्तीची आत्महत्या..
"पैठण तालुक्यातील दावरवाडी येथील धक्कादायक घटना"
पाचोड विजय चिडे प्रतिनिधी -छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामधील दावरवाडी येथील दत्तात्रय सोरमारे या व्यक्तीने सोमवारी रात्री १०:३० वाजेच्या दरम्यान फेसबुक वरती "मी आत्महत्या करत आहे" अशी पोस्ट टाकून दावरवाडी ता.पैठण रस्त्यावरती लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री पावणे बाराच्या दरम्यान उघडकीस आली.
या पोस्टमध्ये आत्महत्या करणार्या व्यक्तीने असे म्हटले की, "प्रिय मित्र आणि नाते वाईक तुम्हाला सांगताना माझा कंठ अतिशय दाटून येत आहे कारण मी तुम्हाला याच्या नंतर कधीही भेटणार नाही माझ्याकडे माझे काही मित्र मंडळ जे काही पैसे आहे माझी प्रामाणिक इच्छा होती का मी आज नाही उद्या तुमचे पैसे दे पण माझ्यावर असं काही प्रसंग आला आहे की मला नाविलाजाने आत्महत्या करावी लागत आहे कारण माझ्यावर असा काही प्रसंग आला की मी कोणालाही तो सांगू शकत नाही कारण माझे एक स्वप्न होती की माझं कुटुंब ग्रॅज्युएट त्यामुळे मी माझ्याकडून मुलांचे उच्च शिक्षणासाठी ऑटोकाठ प्रयत्न केले कधी मला अडचण आली तरी मी कोणतरी हात पाय पसरले आणि त्यांचे शिक्षण केले पण त्याचे फळ म्हणून मला आज आत्महत्या करावी लागत आहे कारण मी सगळं काही करू शकलो पण माझ्या मुलांना मी संस्कार देऊ शकलो नाही त्यामुळे मी आज फाशी घेत आहे कोर्ट कधी सजा देईल नाही दिल पण मी असा निर्णय घेतला की माझ्या गुण्याची मला सजा मिळायला पाहिजे कारण की मी माझ्या मुलांचे शिक्षण करून फार मोठी चूक केलेली आहे काही माझी हितचिंतक असतील माझे नातेवाईक असतील त्यांना माझा हा निर्णय पडणार नाही पण मित्रहो मला माफ करा हा निर्णय माझाच आहे आणि तुम्ही मला खरंच माफ करतात असं मला वाटत नाही तर कृपया मला माफ करावं एवढीच हात जोडून विनंती"
अशी मायनेची पोस्ट टाकली यावेळी ही पोस्ट बघणार आणि तात्काळ या घटनेची माहिती पाचोड पोलिसांना कळवली असता पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी तात्काळ ही माहिती सायबर क्राईम ला देऊन दत्तात्रय सोरमारे यांचे लोकेश हे दावरवाडी शिवारात भेटले असता पोलिसांनी गावकऱ्यांना सोबती घेऊन घटनास्थळी दाखल असता त्यांना तिथे सोरमारे यांनी लिंबाच्या झाडाला गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यावेळी त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने मध्यरात्री चोरमारे यास खाली उतरून पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये उत्तरीय तपासण्यासाठी पाठविण्यात आले आहे.