अवैध देशी दारुची वाहतूक करणाऱ्या एका आरोपींवर गोरेगाव पोलीसांनी पळशी फाटा छापा टाकून अवैध देशी दारुचा साठा केला जप्त.

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात येत असलेल्या गोरेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रवि हुंडेकर यांच्या कडुन पोलीस ठाणे हद्दीतील चोरी छुपे सुरू असलेले अवैध धंदे चालकावर कारवाई मोहिम सुरू असुन दि 8 एप्रिल शनिवारी रोजी रात्री पाच वाजताच्या सुमारास सहायक पोलिस निरीक्षक रवि हुंडेकर यांच्या पथकाने अवैध देशी दारुची पार्सल घेऊन जाणाऱ्या एका आरोपीवर पळशी फाटा येथे छापा टाकून अवैध देशी दारुचे तिन बाॅक्स,एक दुचाकी असा इशारा 31 हजारांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार विठ्ठल नवले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सिद्धार्थ जयराम इंगोले रा खुशाल नगर हिंगोली यांवर विविध कल्मान्वे गोरेगाव पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई सहायक पोलिस निरीक्षक रवि हुंडेकर, विठ्ठल नवले, डाखोरे, लेकुळे यांच्या पथकाने केली आहे.पुढील तपास राहुल मैंदकर करीत आहे.