कासार पडळी शिवारात बिबट्याचे दर्शन.
नागरीकांत भितीचे वातावरण बिबट्याला जेरबंद करण्याची वनविभागाला शेतकऱ्यांची मागणी
पाचोड (विजय चिडे)
कासार पाडळी ता.पैठण शिवारात शुक्रवारी रात्री साडे दहाच्या ता.२९ रोजी बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात भितीचे वातावरत पसरले असून शेत शिवारात व वस्तीवरील नागरिकांनी भितीपोटी गावात धाव घेतली.बिबट्याचे बंदोबस्त करावा अशी मागणी नागकांकडून होत आहे.
पैठण तालुक्यातील कासार पाडळी येथील शेतकरी कैलास गोर्डे हे शेतात राहतात ते दिवसभर शेतात काम आटपुन रात्रीचे जेवण करून झोपले असता. रात्रीच्या वेळी अचानक त्यांना कुत्र्याचा भुंकण्याचा जोरजोराने आवाज आला. यावेळी त्यांनी उठून घराबाहेर पाहिले असता तिथे बिबट्या असल्याचे त्यांना दिसला त्यावेळी त्याची चांगली धावपळ उडाली. बिबट्याने कुत्रं भुंकत असल्याने कुत्र्यावर हल्ला चढवला मात्र कुत्रा त्याच्यात आवडीतून सुटला व त्यावर पुन्हा भुकू लागला त्यामुळे बिबट्या तिथून पळून गेला. असल्याची माहिती त्यांनी शनिवारी सकाळीच वनविभागाला कल्पना दिली असता.वनरक्षक राजू जाधव यांनी ताबडतोब येऊन घटनास्थळाची पाहणी केली असता पायाचे ठसे बिबट्या मादीचेच असल्याचे त्यांनी सांगितले. त्या सोबत एक लहान पिल्लू आहे असे त्यांनी सांगितले नागरिकांनी दक्ष राहावे असे सांगण्यात आले कासार पाडळी बालानगर परिसरातील या बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी वर्ग घाबरलेला आहे .
प्रतिक्रिया.
नागरिकांनी रात्री बाहेर शेतात जाताना हातात बॅटरी ठेवावी.संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान फटाके वाजवावी किंवा मोठा आवाज करावा लहान वासरांना आत मध्ये बांधावे. मोबाईलचे मोठ्या आवाजात गाणी वाजवावी काठीला घुंगरू बांधावे मोठ्या आवाजामुळे बिबट्या जवळ येत नाही तो पळून जातो.
वनरक्षक राजू जाधव
फोटो कॅप्शन
वन विभागाचे वनरक्षक व शेतकरी पायाचे ठसे पाहताना