दोन गटांत तुंबळ हाणामारी ; आठ जण जखमी

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

पंधरा जणांविरुद्ध गुन्हा - थेरगाव येथील घटना

  पाचोड (विजय चिडे)क्षुल्लक कारणावरून दोन गटात लाठ्या - काठ्या व दगडाने झालेल्या तुंबळ हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (ता.सात) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास थेरगाव (ता. पैठण) येथे घडली असून पाचोड (ता.पैठण) पोलिसांनी पंधरा जणांविरुद्ध शनिवारी (ता.आठ) विविध कलमाखाली गुन्हा दाखल केला आला असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

याविषयी सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार,

शेतामध्ये असलेल्या नाल्याच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर मुरूम का टाकला या कारणावरून पैठण तालुक्यातील वडजी थेरगाव या सीमा सरहद्दीत दोन गटांमध्ये तुफान राडा झाल्याची घटना शुक्रवार दिनांक सात एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली आहे दोन्ही गटाकडून पाचोड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून तब्बल 15 जनावर विवीध भादविच्या कलम प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. तर दोन जन एक महिला व एक पुरुष गंभीर जखमी असल्याने छत्रपती सभाजिनगर येथे त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत संबंधित गुन्ह्यामध्ये असलेले फिर्यादी आणि आरोपी यांचे नावे पुढीलप्रमाणे फिर्यादी: शेख बादशहा शेख अब्दुल वय: 55 वर्ष तालुका पैठण जि. संभाजीनगर आरोपी: 1) याकुब कडुभाई शेख 2) युसूष याकुद शेख 3)शेख अयुष शेख याकूब 4 ) हिना सुरु शेन्ड 5) बा शेख सर्व रा. थेरगाव ता. पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर दुसऱ्या गटातील फिर्यादी याकुब कडुभाई शेख आरोपी 1) शेख मुन्ना शेख बादशहा 2) शेख शंखद उलेख जावेद शेख दंग 4)शेख नजीर 5)शेख युसुफ शेख नजीर 6) शेख जमृत शेख नजीर 7) शेर हीना शेख जावेद शेख हसीना ख9) शेख जाबेर शेख नजीर 10 ) शेख बादशहा सर्व राहणार थेरगाव ता पैठण जिल्हा छत्रपती संभाजी नगर या घटनेचा पुढील तपास पाचोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करत आहेत