संग्रामपूर.

जिद्द आणि चिकाटीच्या भरोशावर विद्यार्थ्यांनी स्वतःला अभ्यासात समर्पित केले पाहिजे ,

आजच्या स्पर्धात्मक युगात जर तुम्हाला टिकायचं असेल आणि तुम्हाला यश घ्यायचं असेल तर तुम्हाला अभ्यासात समर्पित करणे गरजेचे आहे यश निश्चितच तुमच्या पायाशी लोडन घेत येईल. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राबविलेला निबंध स्पर्धेचा उपक्रम हा अतिशय कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन प्राचार्य भाऊसाहेब थोटांगे यांनी केले .दिनांक 06 एप्रिल 2023 रोजी संत गुलाब बाबा विद्यालयात पार पडलेल्या बक्षीस वितरण सोहळ्यात ते बोलत होते यावेळी आयोजित कार्यक्रमासाठी माननीय तहसीलदार मुरलीधर गायकवाड स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष आदरणीय प्रशांत डिक्कर रोशन देशमुख गोपाल रहाटे गोकुल गावंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रथमता श्री संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे द्वीप प्रज्वलन करून हार अर्पण करण्यात आले स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तालुक्यातील अनेक शाळेत ८ मार्च या महिला दिनाच्या निमित्ताने मुलींसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन गटात ही स्पर्धा घेण्यात आली होती भारताच्या विकासात महिलांचे योगदान या विषयावर ही स्पर्धा घेण्यात आली होती यावेळी गुलाब बाबा विद्यालयातून माध्यमिक गटात समृद्धी मोहन व्यवहारे प्रथम. आर्या प्रवीण देशमुख द्वितीय. वेदिका अर्जुन गोमासे तृतीय .

तर प्राथमिक गटात

श्रावणी संतोष मोवाड प्रथम. राशी निलेश देशमुख द्वितीय. खुशी हरिदास कुकडे तृतीय. आणि सर्व सहभागी विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवरांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले तर प्रास्तविकातून सहा शिक्षक आशिष चरखे यांनी आयोजनाचा हेतू व उद्देश कथन केला कार्यक्रमाचे संचालन आभार प्रदर्शन क्रीडा शिक्षक सुधीर मानकर यांनी केले कार्यक्रमासाठी विजय राजनकार प्रल्हाद हागे लक्ष्मण लोमटे संदीप राऊत शांतशील दामोदर अनिल ढोकणे सत्वशील आंबीलडिंगे सौ. संजीवनी वानखडे कुमारी दिपाली तायडे सदाशिव  घुगे दीपक सदाफळे यांच्यासह बहुतांश शिक्षक व इतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते