सिल्लोड तालुक्यात अवकाळ पावसाचा कहर

 विज कोसळुन आठ जणावरांचा मृत्यू

( छत्रपती संभाजीनगर)

सिल्लोड तालुक्यात अवकाळी पावसाने कहर केला असुन, जोरदार वादळी वाऱ्यासह सह विजांचा कडकडाट झाला.यात विविध ठिकाणी विज कोसळुन एका युवकासह आठ जणावरांचा मृत्यू झाला.विज पडुन वसई शिवारातील कृष्णा सपकाळ यांच्या तिन गाई,वडोचाथा येथील रामचंद्र चाथे यांच्या दोन गाई,सिरसाळा येथील श्रीराम नरोटे, अंबादास राठोड तर रहिमाबाद येथील शालीक शिंदे यांच्या प्रत्येकी एक गाय ठार झाली.या संपुर्ण घटनेमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.