स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गौळबाजार येथे अवैध देशी दारुचा साठा केला जप्त.

 हिंगोली जिल्ह्यात अवैध देशी दारु विक्री करण्याच्यादृष्टीने बाहेर जिल्ह्यातुन अवैध देशी विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या एका आरोपींवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कळमनुरी तालुक्यातील गौळबाजार येथे आटक केली आहे सदरील आरोपी हा कारमधून देशी विदेशी अवैध दारूची वाहतूक करत होता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदरील आरोपींविरुद्ध कळमनुरी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी गजानन शिवराम ढाकरे यांच्याकडून दारुचा साठा,एक कार असा एकूण 4 लाख 39 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे

  सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक जी श्रीधर ,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, स्थागुशा पोलीस निरीक्षक श्री पंडित कचवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनी शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार संभाजी लकुळे,गजानन पोकळे, लिंबाजी वाव्हळे, गणेश लेकुळे, ज्ञानेश्वर पायघन, प्रशांत वाघमारे यांच्या पथकाने केली आहे