मंगलदास बांदल यांच्या डोक्यात नेमके काय ?
महसूलमंत्री विखे पाटलांच्या भेटीने चर्चेला उधान
( शिक्रापूर प्रतिनिधी ) पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांची पक्षातून हकालपट्टी झालेली असताना ते काही दिवस कारागृहात होते मात्र सध्या बांदल कोणत्याही पक्षात नसून यापूर्वी त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांची भेट घेतली तर सध्या नुकतीच महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली असल्याने मंगलदास बांदल यांच्या डोक्यात नेमके चालले तरी काय अशी चर्चा शिरुर तालुक्यासह पुणे जिल्ह्यात रंगली आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांच्यावर यापूर्वी काही गुन्हे दाखल झाले असल्याने त्यांना पक्षातून काढण्यात आले होते, मात्र बांदल हे वीस महिन्यांहून अधिक काळ कारागृहात राहिले नुकतेच ते बाहेर येत त्यांनी कामाला सुरुवात केली परंतु बांदल यांनी अद्याप कोणत्या पक्षात प्रवेश करत पक्षाबाबत भूमिका जाहीर केलेली नाही, बांदल यांचे पुतणे निखील बांदल यांनी यापूर्वी शिरुर तालुक्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी आमदार पोपटराव गावडे यांनी भेट घेतली होती, तर बांदल यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांची भेट घेतली होती सध्या नुकतीच महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची देखील भेट मंगलदास बांदल यांनी घेतली असून दोघांमध्ये स्वतंत्र चर्चा देखील झाली असल्याने शिरुर तालुक्यात वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत, बांदल शिरुर तालुक्यातील राजकारणात नेहमी आमदार अशोक पवार यांच्या विरोधात राहिले तर त्याबाबत अनेकदा उघड वाच्यता त्यांनी केलेली असताना सध्या अशोक पवार यांचे खंदे समर्थक असलेले आबाराजे मांढरे व मंगलदास बांदल एका बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने अशोक पवार यांच्या विरोधात एकत्र आलेले आहेत. यापूर्वी बांदल यांनी भाजपाकडून विधानसभेची निवडणूक लढवली असून सध्या भाजपचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या निधनानंतर भाजपाकडून अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेला नसून बांदल हे लोकसभेची निवडणूक लढवणारच असे संकेत देत असताना त्यांनी नुकतीच विखे पाटलांची भेट घेतल्याने मंगलदास बांदल यांच्या डोक्यात नेमके चालले तरी काय अशी चर्चा शिरुर तालुक्यासह पुणे जिल्ह्यात रंगली आहे.
स्वतंत्र –
विखे पाटील शिक्रापूर मध्ये आलेले असताना त्यांचा फोन आल्याने आमची भेट झाली असून त्यावेळी शिरुर चे लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक पीएमआरडी कडून कशा कारवाया करत आहेत, शाळेच्या मैदानाला कसा विरोध करत आहेत यांसह तालुक्यातील आदी प्रश्नांवर आमची चर्चा झाली असल्याचे मंगलदास बांदल यांनी सांगितले.
स्वतंत्र -
बांदल लोकसभेला उभे राहिले तर जागा विकेल – बाबाराजे देशमुख
मंगलदास बांदल यांनी यापूर्वी आमदार, खासदार घडवले असून बांदल स्वतः दिल्लीमध्ये हवेत मंगलदास बांदल यांनी लोकसभेची निवडणूक लढवली तर त्यांच्या साठी माझी जागा विकून खर्च करेल असे संकेत देखील बाबाराजे देशमुख यांनी शिक्रापूर येथील एका कार्यक्रमात दिले आहे.