आडूळ येथे गुटखा विक्रेत्यावर कारवाई

पाचोड/पैठण तालुक्यातील आडूळ येथे विक्रीच्या उद्देशाने घरात ठेवलेल्या गुटख्यावर सोमवारी पाच वाजेच्या दरम्यान (दि.३) रोजी पाचोड पोलिसांनी कारवाई केली असूनशेख नदीम शेख नसीम (वय 28)यास अटक करण्यात आली असून ४६ हजार रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आडुळ परिसरामध्ये अनेक दिवसापासून मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा विक्री होत आहे. ही माहिती पाचोड पोलिसांना गुप्तबातमी दारामार्फत सोमवारी मिळाली की आडुळ येथे विक्रीच्या उद्देशाने घरात काही गुटखा ठेवलेल्या आहे ही माहिती पाचोड पोलिस ठाण्याचे पो.उपनिरिक्षक सुरेश माळी, रविंद्र सिरसागर, दुलत,साबळे यांनी पोलिसांना भेटली त्यांनी तात्काळ आडूळ येथील शेख नदीम शेख नसीम यांच्या घराची झाडाझडती घेतली असताना त्यांना दोन पोते अवैधरित्या गुटका साठवून ठेवलेला मिळुन आला असून हा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई पाचोड पोलिसांनी केली आहे.