हार्वेस्टर व आयशर चा अपघात..

"पैठण तालुक्यातील मुरमा शिवारातील घटना"

पाचोड (विजय चिडे) छत्रपती संभाजीनगरच्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पैठण तालुक्यातील मुरमा शिवारातील अनुसया पेट्रोल पंप समोर हार्वेस्टर व आयशरचा अपघात झाला असून यामध्ये एक जण गंभीर रित्या जखमी झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की हार्वेस्टरवरचा अक्षरशः चुराडा झाला असून हार्वेस्टर चालक अक्षरशः एक तास खाली दबून राहिला या अपघाताची माहिती मिळत असताना स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यास हार्वेस्टर बाहेर काढून पाचोड येथे ग्रामीण रुग्णालय मध्ये उपचारासाठी दाखल केले.