शिरुर -' सियावर रामचंद्र की जय ' जय श्रीराम च्या जयघोषात शिरुर शहर परिसरात रामनवमी उत्सहात साजरी करण्यात आली .

समस्त  नामदेव शिंपी समाज  शिरुर  व विश्व हिंदू परिषद बजरंग दल प्रखंड शिरुर यांच्या वतीने रामनवमी निमित्त  रामआळी तील  श्रीराम मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी हभप परमेश्वर महाराज दंडवते यांचे श्रीराम जन्मावर किर्तन झाले. त्यानंतर श्रीराम जन्मोत्सव झाला व पाळणा म्हणण्यात  आला  सुंठवडाच्या  प्रसाद देण्यात आला . यावेळी  महाप्रसादाचे  ही आयोजन करण्यात आले होते .  राममंदिरात दर्शनासाठी भाविकानी मोठी गर्दी केली होती यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर , विवेक बगाडे , सिध्देश्वर बगाडे .राजू बोत्रे ,सागर पांढरकामे ,मिलिंद क्षीरसागर , साकेत गुजर , साकेत गुजर , सागर सारंगधर आदी उपस्थित होते . शहरातील शिवसेवा मंदिर , शनि मंदिर व रामलिंग मंदिरात ही रामनवमी निमित्त धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले .

फोटो ओळी 

रामआळी तील श्रीरामांची मुर्ती