मंदिराचा कळस खाली घेण्यासाठी गेलेल्या तरुणाचा खाली पडून मृत्यू..

"पैठण तालुक्यातील रांजनगाव (दांडगा) येथील घटना"

पाचोड // 

पैठण तालुक्यातील रांजणगाव येथील हनुमान मंदिराचा कळस खाली घेण्यासाठी वरती चाललेल्या एका तीस वर्षीय तरुणाचा खाली पडून मृत्यू झाल्याची घटना दि.29 रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान उघडकीस आली असून राम भीमराव निंबाळकर रा. रांजनगाव (दांडगा) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याविषयी सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, रांजणगाव दांडगा येथील मारुतीच्या मंदिराचे रंगरंगोटी करण्याचे काम मागील काही दिवसापासून सुरू आहे. गावातील राम भीमराव निंबाळकर हा तरुण सायंकाळच्या वेळी मंदिरावरचा कळस खाली घेण्यासाठी गेला असता त्याचा अचानक तोल गेला आणि तो मंदिरावरून खाली पडला. यावेळी स्थानिक नागरिकांनी त्याला तात्काळ पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले असता कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी डॉ.विक्रम ठाकरे यांनी निंबाळकर यास तपासून मृत घोषित केले व शवविच्छेदन करावे लागेल असं वैद्यकीय अधिकारी नातेवाईकांना सांगितले पण नातेवाईकांनी त्या राम निंबाळकर याचा मृतदेह शवविच्छेदन न करता परस्पर गावाकडे देण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.