शिरुर मध्ये पोलिसावर कोयत्याने वार

( शिक्रापूर प्रतिनिधी ) शिरुर येथील पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेल्या पोलीस शिपायावर दोन अज्ञात हल्लेखोराने कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली असून दिपक नागरे असे जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

                          शिरुर ता. शिरुर येथील पोलीस स्टेशन मधील पोलीस शिपाई दिपक नागरे हे २८ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास जोशीवाडी येथून पायी चाललेले असताना दोन युवक दुचाकी ढकलत चाललेले होते, त्यांनी नागरे यांना पेट्रोल पंप कोठे आहे असे विचारले, दरम्यान नागरे यांनी त्यांना हायवेवर पेट्रोल पंप असल्याचे सांगत तुम्ही मोटार सायकल ढकलत का चालले असे विचारले असता त्या युवकांनी तुम्ही कोण आहात असे विचारले असता नागरे यांनी मी पोलीस आहे असे सांगताच त्या युवकांनी धारदार कोयत्या सारखे हत्यार काढून दिपक नागरे यांच्या मानेवर वार केला आणि घटनास्थळा हून दोघे युवक पळून गेले, सदर हल्ल्यात नागरे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शिरुर येथील खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु करण्यात आले असून शिरुर पोलिसांकडून हल्ले खोरांचा शोध घेण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.