शिक्रापूर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेला आरोपी जेरबंद
शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने बीडमधून घेतले आरोपीला ताब्यात
( शिक्रापूर प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विनयभंग प्रकरणी गुन्हे दाखल असलेल्या आरोपीला शिरुर पोलीस स्टेशनच्या कोठडीत ठेवण्यासाठी नेले असताना पोलिसाच्या हाताला हिसका देऊन बेडीसह पळून गेलेल्या धनराज मधुकर डोंगरे शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने बीड जिल्ह्यातून नुकतेच ताब्यात घेतले आहे.
शिक्रापूर ता. शिरुर येथील एका महिलेचे अश्लील चित्रीकरण करत महिलेला दमदाटी केल्याने महिलेच्या तक्रारी वरून शिक्रापूर पोलिसांनी ने २४ मार्च रोजी शिक्रापूर पोलिसांत तक्रार दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी धनराज मधुकर डोंगरे वय ३० वर्षे रा. चारदरी ता. धारूर जि. बीड याचेवर दाखल करत त्याला अटक केली होती, २४ मार्च रोजी रात्री उशिरा शिक्रापूर पोलिसांनी धनराज डोंगरे याला शिरुर पोलीस स्टेशन च्या कोठडीत ठेवण्यासाठी नेले असता शिरुर पोलीस स्टेशनच्या आवारात पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताला झटका मारून धनराज डोंगरे हा हातातील बेडीसह पळून गेला होता, दरम्यान शिरुर पोलीस स्टेशन येथे पुन्हा धनराज डोंगरे याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला, मात्र अटकेतील आरोपी पळून गेल्याने पोलीस दलात खळबळ उडालेले असताना शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार श्रीमंत होनमाने, गणेश करपे, शिवाजी चितारे, अमोल दांडगे, निखिल रावडे, उद्धव भालेराव, जयराज देवकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे राजू मोमीन यांनी सदर आरोपीचा शोध घेत बीड जिल्ह्यात गेले, अखेर आज सायंकाळच्या सुमारास बीड जिल्ह्यातील किल्ले धारूर गावामध्ये धनराज डोंगरे आला असता पोलिसांच्या पथकाने त्याला शिताफीने ताब्यात घेत त्याच्या जवळील बेडी देखील जप्त केली आहे. मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेल्या आरोपीला दोन दिवसात पुन्हा शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने जेरबंद केल्याने शिक्रापूर पोलिसांचे परिसरातून कौतुक होत आहे.