गुन्हात फरार असणारे आरोपींना पाचोड पोलिसांनी पकडले..

पाचोड(विजय चिडे) एखाद्या गुन्ह्यातील आरोपी वर्षानुवर्षे मिळत नसला तरी पोलिसांचा तपास थांबत नाही. पोलिस आरोपींच्या मागावर असतात. कधी ना कधी आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडतोच.पाचोड पोलिस ठाण्यांच्या हर्दीत विविध गुन्ह्यातील आरोपी फरार होते. मात्र,सोमवारी (दि.२०) दोन आरोपीला पैठण तालुक्यातील खेर्डा शिवारातून पाचोडच्या पोलिसांनी अटक केली असून १).जितेंद्र उर्फ जुहीचावला चांद्या भोसले,२)बाळू चक्कू चव्हाण (वय 35 वर्ष) हे दोन्ही रा.सोनवाडी शिवार असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नावे आहेत.

याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहीती नुसार,पैठण तालुक्यातिल सोनवाडी येथील जितेंद्र भोसले व बाळू चव्हाण हे दोघेजणावर अनेक दिवसापासून पुर्वी भादवि कलम 394,395,397,34या नूसार गुन्हे दाखल झाले होते. परंतु हे दोन्ही गुन्हेगार गेल्या काही महिन्यापासून फरार झालेले होते. मात्र, हे सोमवारी खेर्डा शिवारात आल्याची कुणकुण पोलिसांना लागल्यानंतर पाचोड पोलिसांनी तात्काळ या दोन्ही आरोपीच्या हातात बेड्या ठोकल्या अनेक महीन्यानंतर आरोपी सापडले आहे.

या दोन्ही आरोपींना पकडण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती. पाचोड पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संतोष माने, पोलिस उपनिरीक्षक सुरेश माळी,पोलिस नाईक संदिप पाटेकर,पवन चव्हाण,अभिजीत सोनवणे,नागनाथ केंंद्रेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.