कन्नड- गेल्या सहा दिवसापासून राज्य सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी पूर्ण राज्यभर संप करत आहे.अजूनही राज्य शासनातर्फे संपाची दखल घेऊन मागण्या संदर्भात कोणतेही आश्वासन देण्यात आलेले नाही.राज्य शासनाचे फक्त म्हणणे एवढेच आहे की आम्ही या मागणीवर सकारात्मक आहोत आम्ही अभ्यास समिती नेमली आहे आम्ही अभ्यास करू आणि मग जुनी पेन्शन लागू करण्याविषयी विचार करू. पण कोणतेही ठोस आश्वासन नसल्याने राज्यसरकारी कर्मचाऱ्यांना हे मान्य नाही ते जुन्या पेन्शन लागू करा या मागणीसाठी संपावर अजूनही ठाम आहेत.आज सहाव्या दिवशी कर्मचाऱ्यांना तर्फे शासनविरोधात लक्षवेधक थाळीनाद आंदोलन राज्यभर करण्यात आले.कन्नड येथील गटविकास अधिकारी कार्यालय येथे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून थाळी नाद करून शासनाच्या या धोरणाचा विरोध करुन जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी करण्यात आली.या आंदोलनास कन्नड मा.गटविकास अधिकारी ढोकणे साहेब यांनीही सक्रिय पाठिंबा दिला.