हर्षी बु, येथील तीस वर्षीय विवाहित महिला बेपत्ता. 

पाचोड/

 पैठण तालुक्यातील हर्षी ( बु)येथील एक ३० वषीय विवाहित महिला गेल्या पंधरा दिवसांपासून बेपत्ता झालेली आहे. घरच्यांनी तिचा सर्वत्र शोध घेण्याचा प्रयत्न केला असता परंतु तिचा कुठेच काही थांगपत्ता लागला नसल्याने या प्रकरणी पाचोड ता.पैठण पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,हर्षी बु.येथील विवाहित महिला प्रियंका विलास भालेराव वय (३०) ५, मार्च रोजी सकाळपासून कुणाला काही न बोलता घरातून बेपत्ता झाली असून चार वर्षीय नातीचा रडण्याचा आवाज ऐकून सदर विवाहितेची सासु शोभाबाई बाळू भालेराव वय (५०) ह्या तिच्याकडे जाऊन तुझी माय कुठे गेली असे विचारुन शेजा-यासह नातेवाईकांकडे शोध घेतला परंतु तिचा काहीच थांगपत्ता लागला नसून आली नाही तिचे वर्णन खालीलप्रमाणे नाव- प्रियंका विलास भालेराव वय ३० वर्ष रंग गोरा शरीर बांधा सडपातळ उंची ५, फुट अंगामध्ये लाल रंगाची साडी ब्लाऊज लाल पायामध्ये स्लीपर चप्पल शिक्षण ७ वी सोबत नगदी ३०००/-रुपये घेवून कोठे तरी निघून गेली.या प्रकृरणी पाचोड पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.