बलभीम महाविद्यालयाची गौरी जाधव दिल्ली येथील लाल किल्यावर स्वातंत्र्यदिनी करणार पथसंचलन महाराष्ट्रातील ४८ कॅडेटमध्ये गौरी जाधव ही मराठवाड्यातील एकमेव कॅडेट

बीड - येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या बलभीम कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना विभागाची कॅडेट गौरी विष्णु जाधव हीची नवी दिल्ली येथे एक भारत श्रेष्ठ भारत स्वातंत्र्य दिन शिबिरात निवड झाली आहे . मा . आ . प्रकाश सोळंके , सरचिटणीस मा . आ . सतीश चव्हाण , उपाध्यक्ष तथा महाविद्यालय विकास समिती प्रमुख मा . अमरसिंह पंडित , महाविद्यालय विकास समितीचे सर्व सन्माननीय सदस्य , प्राचार्य डॉ . वसंत सानप , उपप्राचार्य डॉ . संतोष उंदरे , उपप्राचार्य डॉ . गणेश मोहिते , प्रबंधक पी . पी . डावकर , कार्यालय अधीक्षक किसन सागडे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत . गौरी जाधवला महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या लेफ्टनंट डॉ . सुनिता भोसले व ५१ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. औरंगाबाद यांचे मार्गदर्शन लाभले . हे शिबिर १ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट या कालावधीत होत असून या शिबिरात संपुर्ण भारतातील २६ राज्यांनी सहभाग घेतला आहे . महाराष्ट्रातून ४८ कॅडेटस सहभागी झाले असून यात मराठवाडा विभागातून गौरी जाधव ही एकमेव विद्यार्थीनी सहभागी झाली आहे . ती महाराष्ट्र गटाचा भाग असेल . ही मराठवाड्यासाठी अभिमानाची बाब आहे . मा . पंतप्रधान | नरेंद्र मोदी आणि | मा . राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासमोर लाल किल्ला येथे गौरी जाधव पथसंचलन करणार आहे . गौरी जाधव ही ग्रामीण भागातील विद्यार्थीनी असून अतिशय मेहनती आहे . गौरी जाधवच्या या यशाबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष