रस्ता ओलांडणाऱ्या ज्येष्ठाचा दोन वाहनांच्या धडकेत मृत्यू

( शिक्रापूर प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरूर येथे मारुतीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्य इसमाला भरधाव वेगाने आलेल्या वाहनाची धडक बसल्याने समोरील विरुद्ध दिशेने आलेल्या वाहनावर आदळून झालेल्या अपघातात बाजीराव शंकर सासवडे या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून देवाचे दर्शन घेण्यासाठी आलेला इसम देवा घरीच गेल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.

                  शिक्रापूर ता. शिरूर येथील बाजीराव सासवडे शनिवार असल्याने सकाळच्या सुमारास मारुती मंदिरात दर्शन घेण्यासाठी आले होते, दर्शन घेऊन परत घरी जात असताना शिक्रापूर पोलीस स्टेशन व ग्रामपंचायत समोरून रस्ता ओलांडत असताना अहमदनगर बाजूने भरधाव वेगाने आलेल्या एम एच १२ ए क्यू ६८३० या टेम्पोची सासवडे यांना जोरदार धडक असल्याने ते जोरात उडून पुणे बाजूने आलेल्या एम एच ४६ बि झेड ९२३३ या कारच्या बोनेटवर पडले, यावेळी कारच्या बोनेटवरुन उडून देखील पुणे नगर रस्त्यावरील दुभाजकावर पडून हाता तोंडाला, डोक्याला गंभीर मार लागून जखमी झाले, त्यांना उपचारसाठी शिक्रापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान बाजीराव शंकर सासवडे वय ७५ वर्षे रा. देवखल मळा शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे यांचा मृत्यू झाला तर घडलेल्या घटनेबाबत आदेश रामदास सासवडे वय २४ रा. देवखल मळा शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी टेम्पो चालक किरण बाळासाहेब राठोड वय ४० वर्षे सध्या रा. सणसवाडी ता. शिरूर जि. पुणे मूळ रा. पिंपळकुटा ता. दारवा जि. यवतमाळ यांच्या विरूध्द गुन्हे दाखल करत त्याला ताब्यात घेतले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेश माने व राकेश मळेकर हे करत आहे.