शिरुर दिनांक  -      कारेगाव ,ता शिरुर  येथील नवले मळा येथे  पोलीस शिपाई  जितेंद्र  केशव  मांडगे वय ३६  रा शिरुर , ता . शिरुर  ,जि पुणे  यांनी गळफास लावून आत्महत्या केली  .

यासंदर्भात पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सदानंद तान्हाजी नवले  रा कारेगाव  यांनी  याप्रकरणी  खबर दिली आहे . दिनांक १५ मार्च  रोजी  ही घटना घडली . कारेगाव येथील  नवले मळातील विहीरातील पाणी  काढण्याचा रशीला जितेंद्र यांनी गळफास घेतला होता . व विहीरीत लटकलेल्या अवस्थेत  होते . मांडगे यांना  उपचारासाठी  शिरुर  येथे नेले असता डॉक्टरानी उपचारा  पुर्वीच ते मृत झाल्याचे सांगितले .दरम्यान मांडगे हे सध्या शिक्रापुर  पोलीस ठाण्यात  पोलीस शिपाई  म्हणुन कार्यरत  होते .