पाथरी:-बिल्किस बानो सामूहिक बलात्कार आणि सामूहिक हत्याकांडातील दोषींना शिक्षा माफी देण्याच्या गुजरात सरकारच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सौ भावना ताई नखाते यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा व जोरदार निदर्शने करण्यात आली.

 यावेळीआलोक भैय्या चौधरी यांनी आपल्या मनोगतात, बलात्काऱ्यांना दिलेली शिक्षा माफी तात्काळ रद्द करण्यात यावी व बिल्किस बानोला न्याय देण्यात यावा अशी मागणी केली.

    सदरील मोर्चात शालेय विद्यार्थी,राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सौ. भावनाताई नखाते तसेच महिला पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी मा.नगरसेवक शाकेर भाई सिद्दिकी, मा. नगरसेवक अलोक चौधरी,शहर अध्यक्ष युवक शेख खालेद , शहराध्यक्ष सुनील उन्हाळे, युवक तालुका अध्यक्ष विष्णू काळे, सरपंच वैजनाथ महिपाल,सरपंच श्याम धर्मे, मा.अध्यक्ष नितेश भोरे,यासिन पठाण, अ. तालुका अध्यक्ष अहेमद अतार,कमलाकर ढवळे, निलेश कांबळे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.