कामामध्ये गुणात्मक वृद्धी करा-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद:

सामान्य नागरिकांसाठी अनेक योजना राबविण्यात येतात त्या राबवितानाच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कामामध्ये गुणात्मक वृध्दी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज दिले.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय सिल्लोड येथे हर घर तिरंगा,स्‍वराज्‍य महोत्‍सव, ई-पीक पाहणी,सातबारा संगणकीकरण, प्रलंबीत फेरफार,आपत्ती व्यवस्थापन या विषया बाबत आढावा बैठक घेण्यात आली.

राष्ट्रप्रेम व्यक्त करण्याचे अनेक मार्ग आहेत पण सन्मान करण्याचा एकच मार्ग असून राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची काळजी घ्यावी. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित कार्यालयाची स्वच्छता करा, लोकांशी प्रेमपूर्वक व्यवहार करा, ई -पीक पहाणीची प्रक्रिया देखील लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

सर्वप्रथम तहसील कार्यालय सिल्लोड येथे जिल्हाधिकारी यांनी वृक्षारोपण केले. त्यानंतर हर घर तिरंगा या माहिती रथास हिरवा झेंडा दाखविला. यावेळी 'हर घर तिरंगा' मोहिम यशस्वी होण्यासाठी बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून जनजागृती करणाऱ्या सरला कुमावत व भारुडाच्या माध्यमातून जनजागृती करणारे भारूडकर शेखर निरंजन भाकरे यांचा सत्कार जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला.

स्वातंत्र्याच्या अमृत मोहोत्सवानिमित होत असलेल्या विविध कार्यक्रमांचा आढावा घेत स्वतः ला झोकून देऊन काम करण्याच्या सूचना शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना केल्या.

यावेळी उपविभागीय अधिकारी संदीप पाटील,उपविभागीय पोलीस अधिकारी विजय मराठे, तहसीलदार सिल्लोडचे विक्रम राजपूत , सोयगवचे तहसिलदार रमेश जसवंत, मुख्याधिकारी सय्यद रफिक, 

गटविकास अधिकारी अहिरे पंचायत समिती सिल्लोड 

प्रकाश नाईक गट विकास अधिकारी सोयगाव तसेच सिल्लोड-सोयगाव उपविभागातील सर्व यंत्रणेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते