शिरुर तालुक्यात महिलेने केला पतीचा खून

रांजणगाव सांडस येथील राक्षेवाडी मधील खळबळजनक घटना

( शिक्रापूर प्रतिनिधी ) रांजणगाव सांडस ता. शिरुर येथील राक्षेवाडी मध्ये पती वारंवार दारू पिऊन त्रास देत मुलांसह पत्नीला मारहाण करत असल्यानेपत्नीने विलास उर्फ विकास गलचंद चव्हाण या इसमाचा खून केल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे सविता विलास चव्हाण या महिलेवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

                          रांजणगाव सांडस ता. शिरुर येथील राक्षेवाडी मध्ये दत्तात्रय शिंदे यांच्या ऊसाचे गुऱ्हाळ मध्ये विलास शिंदे हा पत्नी व मुलांसह कामाला असून विलास हा वारंवार दारू पिऊन येवून पत्नीला व मुलांना शिवीगाळ करत मारहाण करत असल्याने पत्नी सविता हि त्रस्त झाली होती, नेहमीप्रमाणे विलास दारु पिऊन घरी आला त्याने पत्नीला शिवीगाळ करत मारहाण केल्याने चिडून जाऊन सविता हिने पती विलासचा गळा आवळून खून केला, सदर घटनेत विलास उर्फ विकास गलचंद चव्हाण वय ३२ वर्षे रा. राक्षेवाडी रांजणगाव सांडस ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. मोहरडा तांडा ता. कन्नड जि. औरंगाबाद याचा मृत्यू झाला असून याबाबत गोविंद गलचंद चव्हाण वय २४ वर्षे रा. संत तुकाराम कारखाना कासारसाई ता. मुळशी जि. पुणे मूळ रा. मोहरडा तांडा ता. कन्नड जि. औरंगाबाद यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिरुर पोलिसांनी सविता विलास चव्हाण वय ३० वर्षे रा. राक्षेवाडी रांजणगाव सांडस ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. मोहरडा तांडा ता. कन्नड जि. औरंगाबाद या महिलेवर खून केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करत तिला तातडीने अटक करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्रम जाधव हे करत आहे.