विषारी औषध प्राशन करून एका व्यक्तीची आत्महत्या
"पैठण तालुक्यातील पाचोड येथील घटना"
पाचोड/ एका ३२ वर्षीय व्यक्तीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि.१३)रोजी सायंकाळच्या दरम्यान पाचोड ता.पैठण येथे उघडली असून सचिन महादेव शेळके असे आत्महत्या करणार्या व्यक्तीचे नाव आहे.
याविषयी प्राथमिक भेटलेल्या माहिती नुसार, पाचोड ता.येथील सचिन शेळके यांना चार मुली असून ते दररोज मोल मंजुरी करून आपल्या कुटुंबाचा चालत होते. मात्र सोमवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान त्यांनी विषारी औषध प्राशन केले. त्यांनी औषध घेतल्याचे नातेवाईकांच्या लक्षात आले असता. त्यांनी तात्काळ सचिन यास पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयमध्ये उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.पुरुषोत्तम साबळे यांनी त्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले असतात. सचिनची प्रकृती खराब झाल्याने नातेवाईकांनी पुन्हा अर्ध्या रस्त्यावरूनच सचिन यास पाचोड येथे दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले असून त्याची मंगळवारी सकाळी दहाच्या दरम्यान वैद्यकीय अधिकारी डॉ.शेख यांनी उतरणीय तपासणी केली असून घटनेचे नोंद पाचोड पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आलेली असून पुढील तपास प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक पवन चव्हाण हे करीत आहेत.