पाचोड पोलिस ठाण्यात जागतिक महिला दिनानिमित्त महिला पोलिसांचा सत्कार 

पाचोड (विजय चिडे) एक सामान्य महिला जेव्हा यशाच्या उंच शिखरावर पोहोचते तेव्हा ती खरी स्त्री शक्ती असते. तसे पाहिले तर पुरुष शक्तीपेक्षा स्त्रीशक्तीचा जागर अधिक असतो. पूर्वी पोलीस खात्यात महिलांचा टक्का फारच कमी होता. अत्यंत खडतर व कठीण समजल्या जाणाऱ्या पोलीस खात्यात पुरुषांच्या बरोबरीने काम करण्यासाठी महिला पुढे येत नव्हत्या; परंतु,आज परिस्थिती बदलली आहे. 

पोलीस दलात महिलांची संख्या झपाट्याने वाढत आहे. प्रत्येक पदावर महिला काम करत आहेत. 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत पाचोड पोलीस ठाण्यातील महिला पोहेका बत्तीसे मॅडम, संध्या कातकडे, गुंजाळ यांचा सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद मुंडे उपनिरीक्षक सुरेश माळी यांनी सन्मान करण्यात केला आहे.पोलीस स्थानकात महिला पोलीस कायदा व सुव्यवस्था राखण्यात त्या मोलाचे काम करत आहेत. त्याचबरोबर एक पोलीस कर्मचारी आणि पोलीस अधिकारी म्हणून समाजात आपली प्रतिमा कशी उजळून निघेल यावर त्या भर देत आहेत. 

एखाद्या किचकट गुन्ह्याची दिशा कशी निश्चित करावी व आरोपींना गुन्ह्यात कशी कठोर शिक्षा होईल याच अभ्यास या महिला चतुरतेने करतात. या पोलीस स्थानकात महिला पोलीसानी गुन्हेगारांना पकडले आहे आणि त्यांना शिक्षा देखील झाली आहे. त्यामुळे आज जागतिक महिला दिनाचे निमित्त साधून पाचोड पोलीस ठाणे मध्ये असणाऱ्या सर्व महिला कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सपोनि. प्रल्हाद मुंडे,उपनिरीक्षक सुरेश माळी, पोलीस अंमलदार नागनाथ केंद्रे, विलास काकडे हे उपस्थित होते. त्याचबरोबर आज रोजी पोलीस ठाणे येथे ठाणे अंमलदार येथे सर्व महिलांच कर्तव्यावर नेमण्यात आले असून त्यांना पुढे शुभेच्छा देण्यात आल्या.