अवैध दारू विक्री करणाऱ्यास पकडले.

"पाचोड पोलीसांची कारवाई;हजाराचा मुद्देमाल जप्त"

पाचोड(विजय चिडे)

पैठण-पाचोड राज्य महामार्गावरील थेरगाव शिवारात असणारी मराठा हॉटेलवर 'ड्राय डे'च्या दिवशी देखील छुप्यांमार्गाने अवैध देशी विदेशी करणाऱ्या सुनील घायाळ रा.हर्षी.यास मंगळवारी,(दि.७) रोजी सायंकाळच्या सुमारास अवैधरित्या दारू विकताना रंगेहात पकडले असून त्याच्या ताब्यातून ४ हजाराची देशी विदेशी दारूच्या बॉटल्या ताब्यात घेतल्या आहे.

याविषयी सविस्तर माहिती अशी की, थेरगाव शिवारात असणारी मराठा हॉटेलवर गेल्या अनेक महिन्यापासून अवैध देशी-विदेशी दारूची विक्री सुरू असते.विशेष म्हणजे हॉटेल मराठा ही पैठण-पाचोड या राज्य महामार्गाच्या कडेला असल्याने या ठिकाणी मद्यपी मद्यपान केल्यानंतर रस्त्यावर रात्रीच्या वेळी राडा करतात.यामुळे प्रवाशांना व वाहन चालकांना नाहाक त्रास सहन करावा लागतो. या हॉटेल वर अनेक वेळा पोलिसांनी कारवाई केली आहे. मात्र,संबंधित हॉटेल हा पुन्हा मंजुरी करत सतत त्यांनी या ठिकाणी अवैध दारूची करत असतो. आत्ता या हॉटेल मराठा वरती राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई होते का ? हे पण पाहणे महत्त्वाचे ठरणार असल्याचे परिसरातील बोलले जात आहे. आज धुलीवंदनाच्या दिवशी देखील या मराठा हॉटेलवर अवैधरीत्या दारूची विक्री होत असल्याची माहिती गुप्त बातमी दारामार्फत पाचोड पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद मुंडे यांना भेटले असता त्यानी या हॉटेल वर धाड टाकली असता या ठिकाणी सुनील घायाळ रा.हर्षी हा विना परवाना दारूची विक्री करत असल्याचे आढळून आले असता. त्यास पाचोड पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या कडून ४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर कारवाई ही पोलीस अधिक्षक मनीष कलवानिया, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.विशाल नेहूल यांच्या मार्गदशनाखाली स.पो.नि प्रल्हाद मुंढे,पोलीस नाईक संदीप पाटेकर, किशोर शिंदे,नागनाथ केंद्रे, फिरोज बर्डे, दिलीप भुतेकर यांनी ही कारवई केली आहे.