*देवगिरी प्रतिष्ठान बीडच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय महाविद्यालयीन वकृत्व स्पर्धा*
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे: मुख्य संयोजक प्रा.प्रदीप रोडे यांचे आवाहन
बीड(प्रतिनिधी):-लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त देवगिरी प्रतिष्ठान बीडच्या वतीने राज्यस्तरीय महाविद्यालयीन वकृत्व स्पर्धेचे आयोजन शुक्रवार दिनांक १२ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता तुलसी संगणक शास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय,बीड येथे करण्यात आले आहे. या राज्यस्तरीय महाविद्यालयीन वकृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन स्पर्धेचे मुख्य संयोजक तथा देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.प्रदीप रोडे यांनी केले आहे.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गेल्या १३ वर्षापासून राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेचे आयोजन देवगिरी प्रतिष्ठान बीडच्या माध्यमातून करण्यात येते. साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे हे मानवतावादी थोर साहित्यिक होते. त्यांनी आपल्या साहित्यातून व्यवस्थेतील विषमता अधोरेखित केली. त्यांच्या साहित्याने संघर्षशील नायक उभे करून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे त्यांच्या कर्तुत्वाची व साहित्याची चर्चा व्हावी आणि महापुरुषांच्या आदर्शचीची परंपरा भावी पिढी समोर यावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मुख्य संयोजक प्रा.प्रदीप रोडे यांनी केले आहे.
----------------------------------------------
चौकट:-
स्पर्धेचे विषय-
१) अण्णाभाऊ साठे यांचे विचार आणि अनुयायांची भूमिका.
२) अण्णाभाऊ साठे यांची साहित्य आणि कार्यातील तत्त्वज्ञान.
३) अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची प्रसंगीकता.
असे आहेत.
या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक ५०००/- रुपये, स्मृतिचिन्ह,प्रमाणपत्र. द्वितीय पारितोषिक ३०००/- रुपये स्मृतीचिन्ह,प्रमाणपत्र. तृतीय पारितोषिक २०००/- रुपये स्मृतीचिन्ह,प्रमाणपत्र. आणि तीन उत्तेजनार्थ स्पर्धकांना प्रत्येकी १०००/- रुपये स्मृतीचिन्ह,प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
----------------------------------------------
स्पर्धेचे नियम:-
*सुधारली स्पर्धा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. महाविद्यालयातील एका विद्यार्थ्यास या स्पर्धेत सहभागी होता येईल प्रत्येक स्पर्धकास ५० रुपये प्रवेश शुल्क राहील.
*स्पर्धकांनी वरीलपैकी कोणत्याही एका विषयावर आपले वकृत्व सादर करावे.
*स्पर्धेसाठी ५+२ =०७ मिनिटे वेळ देण्यात येईल.
*सभाधिटपणा,भाषा,विषयज्ञान, मांडणी, कौशल्य आणि एकूण परिणाम या निकषानुसार मूल्यमापन केले जाईल.
*परीक्षकांचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक राहील.
*स्पर्धा संपताच निकाल घोषित करून पारितोषिक वितरण केले जाईल.
----------------------------------------------
स्पर्धेसाठी नावनोंदणी:-
आपले नाव नोंदणी करण्यासाठी प्राचार्य तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय, आदर्श नगर ,बीड. मोबाईल क्रमांक: 93 10 66 66 51, प्राचार्य, तुलसी इंग्लिश स्कूल, शासकीय आयटीआय च्या मागे, ज्ञानेश्वर नगर,बीड. मोबाईल क्रमांक: 93 10 66 66 53, प्राचार्य तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन,शासकीय आयटीआय च्या मागे, संत ज्ञानेश्वर नगर, सर्कस ग्राउंड, बीड. मोबाईल क्रमांक: 93 10 66 66 52 यांच्याशी संपर्क साधावा.
----------------------------------------------
स्पर्धेचे मुख्य संयोजक प्रा.प्रदीप रोडे हे असून संयोजन समिती मध्ये प्रा.डॉ.मनोहर सिरसाट,प्रा.राम गव्हाणे,प्राचार्य पांडुरंग सुतार, प्रा.डॉ.रमेश लांडगे,प्रा.राम गायकवाड, प्राचार्य डी.डी.राऊत,प्रा.डॉ.नामदेव शिनगारे, प्रा.डॉ.चंद्रकांत साळवे, प्रा.संजय बागुल,प्रा.डॉ.दशरथ रोडे आदींची स्पर्धेत उपस्थिती राहणार आहे.
----------------------------------------------
स्पर्धेचे जिल्हा प्रतिनिधी:
औरंगाबाद: प्रा.डॉ.सुरेश चौथाईवाले,प्रा.डॉ.संजय सांभाळकर.
परभणी: प्रा.शामसुंदर वाघमारे, प्रा.डॉ.अरुणकुमार लेमाडे.
जालना: प्रा.विलास खिल्लारे.
उस्मानाबाद: प्रा.रवी सुरवसे, प्रा.अरविंद खांडके.
नांदेड: प्रा.सुनील जोंधळे, प्राचार्य डॉ.केशव जोंधळे.
लातूर: प्रा.बाबासाहेब कांबळे, मकबूल शेख.
हिंगोली: प्रा.डॉ.बाळासाहेब साळवे, प्रा.डॉ.सुरेश धिमधिमे आदींचा सहभाग असणार आहे.