हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येक रेशन दुकानदाराकडून धान्य वाटपात पुरवठा विभागाने दिलेल्या नियमाला बगल देत लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित ठेवत असल्याचा आरोप करत याच्या विरोधात विराट राष्ट्रीय लोक मंचने निवेदन देत आंदोलनाचा दिला इशारा.

हिंगोली जिल्ह्यात राशनचा काळाबाजार थांबता थांबेना,या आगोदर ही हिंगोली जिल्ह्यात राशनचे मोठ मोठे घोटाळे विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिलने उघड करुन ही यावर अद्याप ही ठोस कारवाई झाली नाही तर दुसरीकडे  हिंगोली जिल्ह्यात ७९७ रेशन धारक दुकानदार असुन प्रत्येक राशन दुकानदार हे शिघापत्रीका धारकांना पुरवठा विभागाने ठरवुन दिलेल्या निकषानुसार राशनचे धान्य वाटप करत नसल्याने राशन धारक दुकानदारांच्या मनमानी कारभारामुळे गोरगरीब नागरीक हक्कांच्या धान्यापासून वंचित राहत असुन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.याच्या विरोधात विराट राष्ट्रीय लोक मंच कौन्सिलने पुढाकार घेतला असुन जिल्हाधिकारी यांना निवेदन देत राशन धारक दुकानदारांच्या मनमानी कारभारामुळे गोरगरीब नागरीक धान्यापासून वंचित राहत असुन याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिलने दिली आहे नसता १४ मार्चपासून राशन दुकानदार यांच्या मनमानी कारभार विरोधात विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिल आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात दिला आहे. निवेदनावर विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिलचे संस्थापक अध्यक्ष शेख नईम शेख लाल,शेख नौमान,आवेज शेख राहोलीकर,बासित महेबुब, एडवोकेट सय्यद मुस्तफा,रवी जैस्वाल,सतीष लोनकर,शेख अफरोज आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत‌‌.