हर्षी बुद्रुक येथे अखंड हरिनाम सप्ताह

पाचोड(विजय चिडे) पैठण तालुक्यातील हर्षी बुद्रुक येथे जगद्गुरु तुकाराम महाराज वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त मौजे हरेश्वर संस्थान हर्षी बुद्रुक येथे शुक्रवारी दि.३ एप्रिल२३ रोजी पासून अखंड हरिनाम सप्ताह्याला सुरुवात झालेली असुन या निमित्त दररोजचे दैनंदिन कार्यक्रम असे पहाटे चार ते सहा काकडा भजन  सहा ते सात विष्णुसहस्रनाम सात ते दहा ज्ञानेश्वरी पारायण  दहा ते बारा गाथा भजन दुपारी दोन ते पाच भागवत कथा, कथा प्रवक्त्या ह.भ. प.शारदाताई मापारी यांच्या अमृतवाणीतून सायंकाळी पाच ते सात हरिपाठ व रात्री नऊ ते अकरा वाजेपर्यंत जाहीर हरी किर्तन सुरू आहे. नंतर हरिजागर होईल.दि.३ शुक्रवारी रात्री नऊ ते अकरा ह भ प इंद्रजीत महाराज रसाळ यांचे जाहीर आणि कीर्तन झाले तर शनिवारी विजय महाराज गवळी यांचे जय हरी किर्तन होईल रविवारी सुनिता ताई ढोले यांचे कीर्तन होईल सोमवारी सुधाकर महाराज वाघ हर्षी यांचे मंगळवारी योगिता ताई देवकर यांचे बुधवारी ह भ प शिवशाहीर कल्याण काळे भातकुडगावकर यांचे कीर्तन होईल.    गुरुवारी सकाळी नऊ ते अकरा तुकाराम बीजेनिमित्त चंद्रकांत महाराज घायाळ यांचे कीर्तन होईल व रात्री नऊ ते अकरा प्रभाकर महाराज कावले यांचे कीर्तन होईल शुक्रवारी लक्ष्मण महाराज उबाळे वडीगोद्रीकर यांच्या गोड अमृतवाणीतून  काल्याचे किर्तन होईल व नंतर समस्त गावकऱ्यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या परिसरातील भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा  लाभ घ्यावा असे आवाहन हर्षी बुद्रुक येथील गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.